शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

पुस्तके, गणवेश घेण्याची घाई कशाला? मोफत पुस्तके मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 5:00 AM

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शाळा-महाविद्यालये उघडली आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून, येत्या २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंत ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. शिक्षणाच्या अधिकारानुसार एकही मूल शिक्षणापासून सुटू नये या दृष्टीने शिक्षण विभाग कार्य करतो. 

देवानंद नंदेश्वरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा  : शिक्षण विभागाने २०२२-२३ या नवसत्रासाठी यंदा १ ते ८ पर्यंत जिल्ह्यात ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार असून त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. यात सर्व शिक्षा विभागाकडून या विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात आहेत. त्यांना  पहिल्याच दिवशी पुस्तके देता यावीत, यासाठी ५ लाख १६ हजार ७०९ पुस्तकांची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे.कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शाळा-महाविद्यालये उघडली आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून, येत्या २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंत ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. शिक्षणाच्या अधिकारानुसार एकही मूल शिक्षणापासून सुटू नये या दृष्टीने शिक्षण विभाग कार्य करतो. 

कोणाला मिळणार मोफत पुस्तके  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, आदिवासी व जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या गरीब, गरजू मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. अनुसूचित जातीतील सर्व मुले-मुली, अनुसूचित जमातीतील सर्व मुले-मुली यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. 

तीन तालुक्यांना मिळाली

- भंडारा, लाखनी व साकोली या तीन तालुक्यांना पुस्तके मिळाली आहेत. भंडाराला एक लाख एक हजार ३८५ पुस्तके मिळाली असून, ५ हजार २२५ पुस्तके मिळणे बाकी आहे. लाखनीला ६० हजार २०० पुस्तके मिळाली असून ३ हजार ५० पुस्तके बाकी आहेत. साकोलीला ६३ हजार ४६७ पुस्तके मिळाली असून ३ हजार ३२१ पुस्तके बाकी आहेत.

९७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश- भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यात भंडारा १९१३७, लाखांदूर ११९८४,  लाखनी ११३१२, मोहाडी १२६७०, पवनी १३३३३, साकोली १२०७५ व तुमसर १६७५९ विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे.

दोन वर्षे कोरोनाचा अडसर- कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पुस्तके देण्यात आली नाहीत. एकच जोडी गणवेश पुरविण्यात आला. शिक्षण सत्र २०२२-२३ करिता जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ५५० विद्यार्थ्यांना  ५ लाख ७३ हजार ७१७ पुस्तके दिली जाणार आहेत.- सर्वाधिक ४१ हजार ४६३ विद्यार्थ्यांची नोंद गोंदिया तालुक्यात करण्यात आली असून, त्यांच्यासाठी १ लाख ४४ हजार १५२ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र