जन्मदात्याच्या अंगावर मुलीने टाकले उकळते तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:55 IST2020-08-18T13:54:44+5:302020-08-18T13:55:14+5:30

जन्मदात्या वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतून मुलीनेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखनी तालुक्याच्या चिचगाव येथे शुक्रवारी रात्री घडली. यात वडील ४० टक्के भाजले आहे.

Boiling oil poured by the girl on the body of the father | जन्मदात्याच्या अंगावर मुलीने टाकले उकळते तेल

जन्मदात्याच्या अंगावर मुलीने टाकले उकळते तेल


लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जन्मदात्या वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतून मुलीनेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखनी तालुक्याच्या चिचगाव येथे शुक्रवारी रात्री घडली. यात वडील ४० टक्के भाजले आहे.
मनोज महादेव रामटेके (४७) असे जखमी वडिलांचे नाव आहे. प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याला का सोडले, अशी का वागते असा जाब विचारुन मनोज आपल्या मुलीवर रागावले. त्यावेळी तिने उकळते तेल वडिलांच्या अंगावर ओतले. त्यात ते गंभीर जखमी झाले. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात मुलीवर गुन्हा दाखल केला असून मुलगी पसार झाली आहे.

Web Title: Boiling oil poured by the girl on the body of the father