धक्कादायक! पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 14:14 IST2020-09-01T14:13:39+5:302020-09-01T14:14:53+5:30
रुपचंद सदाशिव कांबळे (५५) आणि रत्नमाला रुपचंद कांबळे (४५) असे मृतांचे नाव आहे.

धक्कादायक! पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह
वरठी (भंडार) : पूर ओसरलेल्या घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याची घटना वरठीलगतच्या गणेशनगरीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. पूराच्या पाण्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपचंद सदाशिव कांबळे (५५) आणि रत्नमाला रुपचंद कांबळे (४५) असे मृतांचे नाव आहे. भंडारा - वरठी रस्त्यावर मेहंदी पुलाजवळ एका घरात ते दोघे राहत होते. सदर भाग तीन दिवसापासून पुराच्या पाण्याखाली होता. मंगळवारी पूर ओसरल्यानंतर त्यांचे मृतदेह आढळले. या कुटुंबाला घरातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र घरातील साहित्य आणण्यासाठी पुन्हा घरी गेले आणि घरात अडल्याची माहिती आहे. या घरात दोन शेळ्याही मृतावस्थेत आढळल्या आहेत.