कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:18+5:30

कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा आहे.

Blacklist the contractor | कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला

कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला

Next
ठळक मुद्देएनएसयुआयची मागणी : निवेदन, प्रकरण तुमसरच्या घनकचरा व्यवस्थापनाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नगरपरिषद तुमसर शहरातील विविध प्रभागात दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन स्वच्छतेचे काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेचे कंत्राट शारदा महिला मंडळ रामटेक यांना देण्यात आले आहे. मात्र गत काही महिन्यापासून तुमसर शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन हे केवळ दहा टक्के होत असल्याने कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीचे निवेदन एनएसयुआयतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा आहे. परंतु कंत्राटदाराकडून कोणतेही काम होत नाही शहरातील घंटागाडीद्वारे दिवसातून दोन वेळा सकाळी सात ते एक व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत कचरा गोळा करणे आवश्वक आहे. परंतु एकच वेळा कचरा गोळा केला जातो तसेच दुपारी एकच्या आधीच घंटागाडी कार्यालयात जमा होतात. घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे आवश्यकतेनुसार अंदाजपत्रकाप्रमाणे पाच मजूर सुका कचरा विलगीकृत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात आवश्यकतेनुसार पाच मजूर सुका कचरा विलगीकृत करण्यासाठी, पाच मजूर खत निर्मिती करण्यासाठी असे एकूण दहा मजूर क्षेपणभूमीवर लावणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही कंत्राटदाराने प्रकल्प केंद्रावर फक्त एकच मजूर कार्यरत ठेवला असून इतर मजुरांची व्यवस्था केलेली नाही. घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची गरज असून येथे चौकीदार नेमणे गरजेचे आहे. परंतु प्रकल्प केंद्रावर एकही चौकीदार अथवा कोणताही कर्मचारी नसल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सदर कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाअध्यक्ष पवन वंजारी, तुमसर तालुका अध्यक्ष रोहित बोंबार्डे, केतन साखरगडे, यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक
शहरात कचरा संकलन करणाऱ्या सर्व मजुरांना सुरक्षा साहित्य देणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदाराकडून मजुरांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य आजपर्यत देण्यात आलेले नाही. मजुरांना गणवेश न देता फक्त टी-शर्ट दिले आहेत, मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट दिलेले नाही.घनकचरा केंद्रावरील दोन महिला कामगार कचºयात मिळालेले फाटलेले हातमोजे वापरतात.

Web Title: Blacklist the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.