भंडारा येथे रेमडेसिविरचा काळाबाजार, पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 06:00 IST2021-05-02T06:00:26+5:302021-05-02T06:00:43+5:30

पाच जणांना अटक

Black market of Remedesivir at Bhandara | भंडारा येथे रेमडेसिविरचा काळाबाजार, पाच जणांना अटक

भंडारा येथे रेमडेसिविरचा काळाबाजार, पाच जणांना अटक

ठळक मुद्दे बबन मन्साराम बुधे, सचिन अशोक हुमणे, अनिकेत रंभाड ढवळे यांच्यासह खासगी रुग्णालयाच्या दोन नर्सना अटक करण्यात आली आहे

भंडारा : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका खासगी रुग्णालयातील दोन नर्ससह पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिसांनी बनावट  ग्राहक पाठवून शुक्रवारी रात्री  केली. अटकेतील आरोपींना तीन दिवासांची पोलीस कोठडी देण्यात आली.

बबन मन्साराम बुधे, सचिन अशोक हुमणे, अनिकेत रंभाड ढवळे यांच्यासह खासगी रुग्णालयाच्या दोन नर्सना अटक करण्यात आली आहे. बनावट ग्राहकाच्या मदतीने चार इंजेक्शनचा सौदा एक लाख वीस हजार रुपयांत करण्यात आला. त्यानंतर, बबन बुधे याने नियोजित ठिकाणी इंजेक्शन देण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी रात्री उशिरा इंजेक्शन घेत असताना, मोठ्या शिताफीने चार इंजेक्शनसह बबन व सचिन यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, दोन नर्सची नावे पुढे आली. या दोन्ही नर्सच्या घराची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात औषधीचा साठा आढळून आला, तसेच जादा दराने विकलेल्या औषधीचे ९०. हजार रुपये, तीन मोबाइल, मोटारसायकल जप्त करण्यात आली.

Web Title: Black market of Remedesivir at Bhandara