जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:39+5:30

धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु शासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी येथील जिल्हा पणन कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांचे धानाचे थकीत असलेले बाेनसचे पूर्ण पैसे त्वरित द्यावे, धानाची भरडाई तत्काळ करावी, शिल्लक असलेला सर्व धान खरेदी करावा, अशा मागण्या करीत जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप ठाेकले.

BJP locks district marketing office | जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप

जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे प्रश्न : थकीत बाेनस द्यावा आणि संपूर्ण धानाची उचल करावी

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  शेतकऱ्यांना थकीत बाेनस द्यावा आणि संपूर्ण धानाची उचल करावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत येथील जिल्हा पणन कार्यालयाला शुक्रवारी कुलूप ठाेकले. भाजपचे शेकडाे कार्यकर्ते कार्यालयावर धडकले हाेते. या आंदाेलनाचे नेतृत्व खासदार सुनील मेंढे, आमदार डाॅ. परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी केले. 
धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु शासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी येथील जिल्हा पणन कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांचे धानाचे थकीत असलेले बाेनसचे पूर्ण पैसे त्वरित द्यावे, धानाची भरडाई तत्काळ करावी, शिल्लक असलेला सर्व धान खरेदी करावा, अशा मागण्या करीत जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप ठाेकले. यानंतर शेतकऱ्यांचा माेर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी आंदाेलनकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पणन अधिकारी कार्यालयाला ठाेकलेल्या कुलपाची किल्ली जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पुद करण्यात आली. 
या आंदाेलनात ब्रह्मानंद करंजेकर, नेपाल रंगारी, वामन बेदरे, राजेश बांते, तिलक वैद्य, हेमंत देशमुख, प्रदीप पडाेळे, सुदाम शहारे, विलास काटेखाये, मुन्ना फुंडे, घनश्याम खेडीकर, रेखाताई भाजीपाले, धनवंता राउत, विनाेद बांते, चंद्रप्रकाश द्रुगकर, चैतन्य उमाळकर, रामदास शहारे, काेमल गभणे, कल्याणी भुरे, संजय कुंभलकर, दिनेश निमकर, सुरेंद्र आयतुलवार, अनुष्का खैरे, विनाेद भुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका - सुनील मेंढे
शेतकऱ्यांची दिशाभूल करून अधिक काळ राजकारण केले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गरज असताना मदत मिळत नसेल तर शेतकरी नेते म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करणे बंद करा, अन्यथा भविष्यात आंदाेलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, अशा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला.
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे : फुके
आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांना त्यांचे अधिकार मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले.

 

Web Title: BJP locks district marketing office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.