शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाजीच्या तपोभूमीत जन्मोत्सव सोहळा

By admin | Updated: February 12, 2015 00:33 IST

संतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव ....

राजू बांते मोहाडीसंतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.दीड हजार लोकवस्ती असणाऱ्या कान्हळगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज, दामोधर महाराज, अन्नाजी महाराज, शंकर महाराज, सत्यपाल महाराज या संताचे विचार आजही कान्हळगावला चैतन्य व प्रेरणा देणारे आहेत. १९३४ साली अन्नाजी महाराजांनी गावकऱ्यांना भक्तीमार्गाकडे वळविले. अन्नाजींचे कान्हळगावात १४ वर्ष वास्तव्य होते. प्रितलाल सव्वालाखे, रामचंद्र नखाते, शामराव लिल्हारे, रामचंद्र कुकडकर, बळीराम लेदे, तुळशिराम बांते ही प्रमुखकर्ते मंडळी होती. १९४९ रोजी जातीय एकता निर्माण होण्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्वजाती धर्माचे लोक सहभोजनात त्या काळी सहभागी झाली होती. या स्तुत्य कार्याची दखल अधिकारी वर्गाने घेतली होती.भंडारा आताचा गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कान्हळगावात आले होते. अन्नाजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज यांच्या सहयोगाने १९३६ मध्ये राष्ट्रसंताचे पाय कान्हळगावात पडले होते. यावेळी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रसंताच्या भजनाचा आस्वाद परिसरातील जनतेला घेता आला होता. स्वच्छता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर राष्ट्रसंताची भजने झाली होती. गावात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले होते. राष्ट्रसंताच्या प्रेरणेने १९३७ साली कान्हळगावात गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना झाली होती. गावातील लोकांनी श्रमदानातून गुरूदेव सेवा मंडळाच्या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीला दरबार हे नाव देण्यात आले होते. आता दरबार उध्वस्त झाला आहे. उंबरीच्या झाडाखाली अन्नाजींची कुटी होती. ते उंबराचे ऐतिहासिक झाड अजूनही शाबूत आहे.अन्नाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन राज्यसभा खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी वीस वर्षापूर्वी केले होते. तथापि, निधीअभावी स्मारकाचे बांधकाम झाले नाही. पूर्वी गावात रामधूनद्वारे लोकात चेतना निर्माण होत होती. सहकार्य, सेवाभाव कृत्तीची बीजे कान्हळगावात पेरली गेली आहेत. १९४२ च्या दरम्यान स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला होता. याचवेळी कान्हळगावात विश्वशांती सप्ताह पार पडला होता. अन्नाजी महाराज कान्हळगावात येथे आध्यात्मिक व सामाजिक कार्यात रममाण असताना स्वामी सितारामदास महाराज यांनी अन्नाजींना नरसिंह टेकडी माडगी येथील वैनगंगेच्या सानिध्यात योगसाधना करण्याची प्रेरणा दिली. अन्नाजी महाराज कान्हळगाव येथून १९४९ ला नरसिंह टेकडी येथे गेले. काही काळानंतर त्यांचे टेकडीवर देहावसान झाले. दरवर्षी कान्हळगावात अन्नाजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी ११४ वी जयंती १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी रोजी जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामसफाई, सामुहिक ध्यान, कीर्तन, गोपालकाला आदी कार्यक्रम होणार आहेत. सामुदायीक जीवनाची संस्कृती जपणाऱ्या या गावात सामुदायीक प्रार्थना व आठवड्याला प्रभातफेरी काढण्याचे काम नित्याचे गुरूदेव सेवा मंडळाने कायम ठेवले आहे. प्रार्थनेत विशेषत्वाने बालमंडळींचा सहभाग असतो. अन्नाजींचे प्रेरणास्थळी प्रार्थना स्थळ तयार करण्यात आले आहे. संताची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला संत मंडळींनी आदर्श ग्रामची पावती दिली आहे.