शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपंग शाळा संस्थाचालकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By admin | Updated: February 18, 2015 00:24 IST

अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य शिक्षण संस्थाचालक करीत आहेत. मात्र, समाजकल्याण विभागाकडे त्यांचे १४ वर्षांपासूनचे अनुदान प्रकरण प्रलंबीत आहे.

भंडारा : अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य शिक्षण संस्थाचालक करीत आहेत. मात्र, समाजकल्याण विभागाकडे त्यांचे १४ वर्षांपासूनचे अनुदान प्रकरण प्रलंबीत आहे. यावर तोडगा निघण्याची अपेक्षा धुसर झाल्याने हे संस्थाचालक महिनाभरापासून साखळी उपोषणावर बसले आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी संस्थाचालकांनी सोमवारी 'भीक मांगो' आंदोलनाचे हत्यार उपसले.अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षणासोबतच त्यांचे संगोपन करण्यासाठी राज्यातील खासगी शिक्षण संस्थांनी शाळा, कर्मशाळा सुरू केल्या. सामाजिक न्याय विभागांतर्गत अपंग कल्याण आयुक्तालयाकडून मान्यता घेऊन मागील १४ वर्षांपासून अनुदानाविना शाळा सुरू आहेत. अपंगांच्या विशेष शाळांना दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे निकष पूर्ण तपासणी करून अनुदान देण्याची शासनाचे धोरण व नियम असतांनाही शाळा संस्थाचालक अनुदानापासून वंचित आहे.काँग्रेसप्रणित आघाडी शासनाने संस्थाचालकांना केवळ आश्वासन दिली. मात्र अनुदान दिले नाही. त्यामुळे या संस्थाचालकांवर आर्थिक संकट ओढवले असल्याने त्यांनी प्रादेशिक अपंग शाळा कर्मचारी संस्था चालक संघटना, नागपूरच्या नेतृत्वात नागपूर विभागातील संस्थाचालकांनी अनुदान मागणीसाठी १२ जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. भंडारा येथे संघटनेचे अध्यक्ष गणेश हुकरे यांच्या नेतृत्वात मागील ३७ दिवसांपासून शहरातील त्रिमुर्ती चौकात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान संस्थाचालकांनी अनुदान मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ शाळा बंद असल्याने त्यात विद्यार्जन घेणाऱ्या ७९० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद केल्याने पालकांनी पाल्यांना घरी नेले आहेत. परीक्षेच्या तोंडावर संस्थाचालकांनी शाळांना कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्त सोमवारला 'भीक मांगो' आंदोलन केले. यापूर्वी सामुहिक मुंडन, आमरण उपोषण केले. मात्र शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याबाबत शासनाने अनुदानाचा प्रश्न त्वरीत निकाली काढला नाही तर संस्थाचालक तिव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (शहर प्रतिनिधी)