Bhandara: तुमसर वनपरिक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:47 IST2025-01-06T14:46:59+5:302025-01-06T14:47:51+5:30
Bhandara News: तुमसर तालुक्यातील तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झंजेरिया गावाजवळील घनदाट जंगलात एक वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकिला आली.

Bhandara: तुमसर वनपरिक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळला
तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्यातील तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झंजेरिया गावाजवळील घनदाट जंगलात एक वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकिला आली. विशेष म्हणजे मृतावस्थेत आढळलेला वाघ तीन तुकड्यात दिसून आला. पंधरा दिवसातील वाघ मृताअवस्थेत आढळल्याची दुसरी घटना आहे. ही शिकार की वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.