शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 19:42 IST

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १६ व्या फेरीत २ लाख ७० हजार ४७१ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

भंडारा/गोंदिया - भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमधील लढतीमुळे लक्ष लागून राहिलेल्या  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांनी तब्बल 40 हजार मतांनी भाजपाच्या हेमंत पटलेंचा पराभव केला. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे कुकडे हे आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखत भाजपाच्या पटलेंना पराभवाची धूळ चारली.

तत्पूर्वी मधुकर कुकडे यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगामुळे मतमोजणी केंद्रावर काहीसा तणाव निर्माण झाला होता. केंद्रावर तैनात असलेल्या पोलीस अधिक्षकांनी मधुकर कुकडेंना ओळखले नाही. त्यामुळे त्यांनी कुकडे यांच्याकडे ओळखपत्र मागितले. यामुळे कुकडे आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कुकडेंना माफी मागा, अन्यथा नियुक्तीपत्र देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप मधुकर कुकडेंनी केला आहे.

(भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत)

ठळक घडामोडी

 

 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे.  राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आघाडीवर आहेत.  

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,62,287    हेमंत पटले - (भाजपा) - 1,49,935 - सहावी फेरीमधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,02,000हेमंत पटले - (भाजपा) - 94,868

- पाचवी फेरीमधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 85,160हेमंत पटले - (भाजपा) - 80,131

चौथ्या फेरीत राष्ट्रवादी 3959 मतांनी पुढे 

-तिसरी फेरीमधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 51219हेमंत पटले - (भाजपा) - 48382

- मतमोजणी माहिती मिळण्यास विलंब. आठवी फेरी सुरू असताना तिसऱ्या फेरीची माहिती जाहीर.

- दुसरी फेरी : मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 35512 मतं, हेमंत पटले - (भाजपा) - 33306 मतं

भारिपा - 778इतर - 448

- तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी आघाडीवर, भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर 

- तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

- पोस्टल मतमोजणीत भाजपा आघाडीवर 

- मतमोजणीस प्रारंभ, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणारपहिली फेरी              1) मधुकर कुकडे- 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस)        2)हेमंत पटले-   17246  (भारतीय जनता पार्टी)       3) अक्षय पांडे-  195 (विदर्भ माझा पार्टी)            4)गोपाल उईके   150  (गोंडवाना गणतंत्र पार्टी)       5) डॉ.चंद्रमणी कांबळे-  101 (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया)6)जितेंद्र राऊत-   54   (अखिल भारतीय मानवता पार्टी)      7)धरमराज भलावी-  139 (बहुजन मुक्ती पार्टी)    8) नंदलाल काडगाये-  120 (बळीराजा पार्टी)  9)राजेश बोरकर-  119 (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)      10)एल.के.मडावी- 778    (भारिप  बहुजन महासंघ)11)अजबलाल तुलाराम- 333 (अपक्ष)12) किशोर पंचभाई- 49 (अपक्ष)13)काशीराम गजबे-   445 (अपक्ष)14)चनीराम मेश्राम-  68  (अपक्ष)15) पुरुषोत्तम कावळे- 142(अपक्ष)16)राकेश टेभरे- 329(अपक्ष)17)रामविलास मस्करे- 448(अपक्ष)18) सुहास फुंडे- 356 (अपक्ष)NOTA-226

 

 

नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे बुधवारी (30 मे) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर फेरमतदान घेण्यात आले. यावेळेस, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेऊन त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगानं स्पष्ट केलेले नाही. 

(Palghar Loksabha Bypoll Result Live: पालघर कुणाचं? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार)

 

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण