Bhandara: कृषी विभागात ४३५ पैकी २०० पदे रिक्त; कसे होणार शेतकऱ्यांचे भले? जिल्ह्यात २३५ मनुष्यबळावर सुरू आहे कृषी विभागाचे कामकाज

By युवराज गोमास | Published: June 12, 2023 07:14 PM2023-06-12T19:14:42+5:302023-06-12T19:15:12+5:30

Bhandara: शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहे.

Bhandara: 200 out of 435 posts vacant in Agriculture Department; How will farmers benefit? The work of agriculture department is going on in the district with 235 manpower | Bhandara: कृषी विभागात ४३५ पैकी २०० पदे रिक्त; कसे होणार शेतकऱ्यांचे भले? जिल्ह्यात २३५ मनुष्यबळावर सुरू आहे कृषी विभागाचे कामकाज

Bhandara: कृषी विभागात ४३५ पैकी २०० पदे रिक्त; कसे होणार शेतकऱ्यांचे भले? जिल्ह्यात २३५ मनुष्यबळावर सुरू आहे कृषी विभागाचे कामकाज

googlenewsNext

- युवराज गोमासे
भंडारा -  शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहे.विभागात मंजूर ४३५ पदांपैकी केवळ २३५ पदे भरलेली असून २०० पदे रिक्त आहेत. परिणामी कसे होणार शेतकऱ्यांचे भले, असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भंडारा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील जवळपास ६५ टक्के नागरिक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना व प्रंकल्पांचे संचालन केले जाते. योजनांचा थेट लाभ दिला जातो. नवे तंत्र व आधुनिक बदलांसबंंधी प्रयोगशिल प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन दिले जातात. परंतु, या विभागात रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे २०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा नाथ कुणी नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गट 'अ' व 'ब' ची १७ पदे रिक्त
गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची ५ पदांपैकी ४ पदे रिक्त आहेत. नुकतेच अधिक्षक कृषी अधिकाऱ्याचे पद भरले गेले आहे. कृषी उपसंचालकाची ४ पैकी ४ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील १७ पैकी ९ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील कनिष्ठ अधिकाऱ्यांची २३ पैकी २ पदे तर सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱी व लेखा अधिकाऱ्यांची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. एकूण ४२ पैकी २९ पदे भरलेली असून १३ पदे रिक्त आहेत.

गट 'क' प्रवर्गातील १२९ जागा रिक्त
गट क प्रवर्गातील कृषी पर्यवेक्षकांच्या मंजूर ४३ पैकी ४१ पदे भरलेली असून २ जागा रिक्त आहेत. यात कृषी सहाय्यकांची ७१ पदे रिक्त आहेत. लघुलेखक निम्नक्षेणी व अधीक्षकाची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. सहाय्यक अधीक्षकाची एक तर कनिष्ठ लिपीकांच्या ७ जागा रिक्त आहेत. आरेखक एक, अनुरेखकाच्या ३३ तर वाहन चालकांच्या ११ जागा रिक्त आहेत.

गट 'ड' प्रवर्गातील ५४ पदे रिक्त
या प्रवर्गातील ७० पैकी १६ जागा भरलेल्सा असून ५४ जागा रिक्त आहेत. यात रोपमळा मदनिसांच्या ६, शिपायांच्या ४० जागा रिक्त आहेत. तालुका बीजगुणन केंद्रातील मजुरांच्या ८ जागा रिक्त आहेत.

सुट्टीच्या दिवशीही कामकाज
कामे प्रलंबीत राहू नयेत म्हणून अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात कामकाज करतात. शनिवार व रविवारलाही कामात व्यस्त असतात. रिक्त पदांमुळे शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.

एका सहाय्यकाकडे तीन साज्यांचा प्रभार
थेट योजनांवर काम व प्रकल्पांचे संचालन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सहाय्यक करतात. परंतु रिक्त पदांमुळे दोन ते तीन साज्यांचा प्रभार सांभाळतांना त्यांची दमछाक होते.

रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत असला तरी शेतकऱ्यांसाठी लोकोपयोगी कामे करावीच लागतात. शासनाने रिक्त पदांचा भरणा केल्यास कामकाज चालविणे सोयीचे हाेईल. - संगिता माने, अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा.

Web Title: Bhandara: 200 out of 435 posts vacant in Agriculture Department; How will farmers benefit? The work of agriculture department is going on in the district with 235 manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.