उत्कृष्ट कार्याने सन्मानाचे मानकरी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:20 AM2019-09-05T01:20:40+5:302019-09-05T01:21:09+5:30

मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते.

Be the standard of honor with outstanding work | उत्कृष्ट कार्याने सन्मानाचे मानकरी व्हा

उत्कृष्ट कार्याने सन्मानाचे मानकरी व्हा

googlenewsNext
ठळक मुद्देनवनाथ कातकडे : मोहाडीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शासकीय कर्मचारी जनतेचे सेवक म्हणून सेवा करीत असतात. सेवानिवृत्तीनंतर कामाची पावती जनतेकडूनच मिळत असते. कर्मचाऱ्यांनी जनतेचे काम सामाजिक दृष्टीकोन ठेऊन काम केले पाहिजे. उत्कृष्ट काम आपल्या प्रदीर्घ कामाची पावती व सन्मान मिळवून देतो, असे प्रतिपादन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी केले .
मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार घनश्याम सोनकूसरे उपस्थित होते. तलाठी जगदीश कढव, अशोक मेश्राम सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते करण्यास आला. नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे म्हणाले, सेवा करतांना आनंद वाटला पाहिजे. ताण यायला नको. समोर आलेल्या प्रकरणाचा अभ्यास केला पाहिजे तरच प्रशासकीय कामे सुलभ होतात. यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकाळातले अनुभव कथन केले. संचालन रामनारायण धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन अंकुश धांदे यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी मडामे, मिश्रा, सुरजुसे, तागडे, तलाठी मदनकर, समरीत, घोडेस्वार, पराग तीतीरमारे, देशभ्रतार, अव्वल कारकून धकाते, हेडावू, शिल्पा डोंगरे, कनिष्ठ लिपिक उमेश बारापात्रे, मानकर, अंकुश कावरे, सागर बावरे, कावळे, शिपाई सिद्धार्थ रामटेके, सव्वालाखे, हितेश शेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Be the standard of honor with outstanding work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.