शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

सावधान ! जिल्ह्यात वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देमार्चमध्ये ५१९ रुग्णांची नोंद : सर्वाधिक ३२० रुग्ण भंडारा शहरात, शुक्रवारी ७५ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात सर्वत्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडरा जिल्ह्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. मार्चच्या अवघ्या बारा दिवसात जिल्ह्यात ५१९ रुग्ण आढळून आले असून त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी तर अलीकडच्या काळातील सर्वाधिक ७५ रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर भंडारा शहरातही लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळला तर रुग्णांची संख्या वाढली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून तर कोरोना रुग्णांची संख्या एकदम कमी झाली होती. त्यामुळे सर्व निर्बंध शिथील झाले. नागरिक बिनबोभाटपणे नियमांना पायदळी तुडवत शहरात भटकू लागले. नागपूरसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा होती. परंतु नागरिक त्यानंतरही नियम पाळताना दिसत नव्हते. परिणामी आता हळूहळू का होईना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे.१ मार्च ते १२ मार्चच्या दरम्यान १९ हजार ६७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५१९ जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा शहरातील ३२० रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १ मार्च राेजी २६ रुग्णांची नोंद झाली होती. १० मार्चपर्यंत हा आकडा ५० च्या आत होता. परंतु गुरूवारपासून रुग्णांची संख्या वाढायला लागली. गुरूवारी जिल्ह्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. तर शुक्रवारी तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे सुरूवातीला दीड हजाराच्या आसपास चाचण्या केल्यानंतर सरासरी ५० च्या आत रुग्ण आढळत होते. परंतु शुक्रवारी केवळ ६२१ रुग्णांच्या चाचण्या केल्या असता तब्बल ७५ रुग्ण आढळून आले. ही भंडारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे. परंतु नागरिक त्या पायदळी तुडवत आहे.

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४४६

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असताना गत बारा दिवसात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ४४६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कुणीही गंभीर आजारी नसले तरी ॲक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात २६९ आहेत. मोहाडीत १८, तुमसर ६१, पवनी २७, लाखनी ४१, साकोली २७ आणि लाखांदूरमध्ये अवघे तीन रुग्ण आहेत.

मार्च महिन्यात केवळ एक मृत्यू भंडारा जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर सुरूवातीपासूनच अल्प आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात केवळ भंडारा तालुक्यातील एका वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर २.३१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ९४.५५ टक्के आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या