बावनथडी कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:01:12+5:30

तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

Bawanthadi canal breach | बावनथडी कालव्याला भगदाड

बावनथडी कालव्याला भगदाड

Next
ठळक मुद्देखापा-काटेबाम्हणी येथील प्रकार : बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील कालवा बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या कालव्यातून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने कालव्यातील माती वाहून जात कालवा फुटण्याच्या भीती बळावली आहे.
तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्प दिवास्वप्न ठरु पाहणाऱ्या प्रकल्पात यंदा पाहीजे तेवढा पाण्याचा मुबलक शिल्लक साठा उपलब्ध नाही. पावसाच्या लपंडावामुळे मात्र सध्याच्या घडीला तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पीक रोवणीसाठी कालव्यामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.
गत काही वर्षापूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या खापा-काटेबाम्हणी शिवारातील सिमेंटच्या मुख्य कालव्याला भगदाड पडले असल्याने कालव्यातील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात कालवा फुटण्याची शक्यता येथे बळावली आहे. तर येथील हजारो शेतकऱ्यांच्या शेतपीकाची व कालव्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याकडे मात्र संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची फाळणी करीत टाकलेल्या बावनथडी कालव्याचे व वितरीकेचे बांधकाम मात्र अद्याप अपूर्णच असले तरी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कालव्याद्वारे गत चार ते पाच वर्षापासून पाणी सोडण्यात येत आहे.
त्या धर्तीवर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोबदल्यात पाणी कर शेतकऱ्यांकडून नियमीत वसूल करण्यात येते. येथे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मात्र अद्याप पाणी वाटपासंबधी ध्येयधोरण ठरविण्यात आले नाही. प्रकल्पबाधित बहुतांश गावात गावनिहाय सुध्दा पाणी वाटप समिती तयार करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमीनीपर्यत कालव्या द्वारे समितीच्या ध्येयधोरणानुसार पाणी पोहचविण्याची जबाबादारी आहे. मात्र त्या समिती सदस्यांकडून पाणी वाटपच करण्यात येत नसल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे. कालव्याद्वारे देण्यात येणाºया पाण्याचे योग्य नियोजन करीत व अपव्यय टाळत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर टेलपर्यंत पहिल्यांदा पाणी पोहचवणे गरजेचे असताना येथे नजीकच्या शेतकºयांना प्रथम पाणी पुरवठा होत आहे. यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो शेतकºयांना बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेमुळे धान रोवणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

कालव्याची वेळीच दुरूस्ती गरजेची
प्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. या समस्येकडे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून कालव्याची वेळीच दुरूस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येथील कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे. अन्यथा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ नये, ही अपेक्षा.

Web Title: Bawanthadi canal breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.