शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटातील बिऱ्हाड झाडीपट्टीत दाखल

By admin | Updated: March 6, 2015 01:02 IST

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पोटाची खळगी भरण्यासाठी वाळवंटातील उंटासह जनावरे घेऊन अनेक कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह झाडीपट्टीत दाखल झाले आहेत.

भंडारा : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व पोटाची खळगी भरण्यासाठी वाळवंटातील उंटासह जनावरे घेऊन अनेक कुटुंब आपल्या बिऱ्हाडासह झाडीपट्टीत दाखल झाले आहेत.आपल्या कुटुंबासोबत असलेल्या उंट व मेंढ्यांचा कळप सांभाळणे, त्यांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करणे व यासोबतच पुंजी आपल्यासोबत नेणे हा उद्देश घेऊन कच्छमधील ही मंडळी येत आहे. ती अवाढव्य उंट व सोबत मेंढ्याचा कळप मुलाबाळांसह आलेल्या या माणसांना विचारले असता विदर्भाचा मोठेपणाच आपल्याला ग्रामीण भागाकडे आकर्षित करतो. जेव्हा पाण्याची कमतरता असायची तेव्हाच आम्ही या भागात आमच्या बिऱ्हाडाचे दस्तान मांडत होतो. त्यावेळी विहिरीत बादली टाकली तरी पाणी मिळत असे, आता मात्र ९५ टक्के विहिरीत बोअर असल्यामुळे वीज खंडित झाली तर पाण्यासाठी तळपणाऱ्या व्यक्तीलाही पाणी मिळत नाही. एवढी जीवघेणी पाण्याची समस्या आहे. निवळ चारा आणि आणि यासाठी राजस्थानी व कच्छ मधील बिऱ्हाड त्यांचेकडील जनावरांना शेतात बसवायचे तेव्हा यासाठी मोबदला घेतला जात असे. तसे ही परीस्थिती आज पुर्णपणे बदलली आहे. आज तर शेजारचा शेतकरी या बिऱ्हाडाला आपल्या शेतात येण्याला मज्जाव करीत आहे.उंटासारख्या अवाढव्य प्राण्याला सोबत आणण्यात या राजस्थानी, बिऱ्हाडाचा एकच उद्देश असतो तो म्हणजे त्यांनी सोबत आणलेले राहणीमानाची साधने यात खाटांपासून तर उपजिविकेची साधनसामुग्री यांना वाहून नेण्यासाठी उंटाचा उपयोग केला जातो. यासोबत त्यांची कुत्री व घोडेही असतात. याठिकाणी हे आपले बस्तान मांडतात, त्याला ‘बेडा’ म्हणतात. बेड्यांचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. या लोकांचा ग्रामीण भागातील आगमनामुळे बाजारपेठेची उलाढाल वाढते. या बेड्यातील महिलाच बाजारपेठेतील खरेदी सांभाळतात. त्यामुळे सर्व दुकानदार यांचेकडे अपेक्षेने पाहतात. कारण त्यांची खरेदी हजारोंच्या घरात असते. (नगर प्रतिनिधी)