निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहाराचा पुरवठा

By Admin | Updated: December 16, 2015 00:38 IST2015-12-16T00:38:19+5:302015-12-16T00:38:19+5:30

शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणारा शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ठ दर्जाचा आहे.

Bad Nutrition School Nutrition Supplies | निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहाराचा पुरवठा

निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहाराचा पुरवठा

बुबूळ लागलेले कडधान्य : पुरवठाधारकाला शिक्षण विभागाचे अभय
पवनी : शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणारा शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ठ दर्जाचा आहे. तो त्वरीत बंद करावा अशी मागणी मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी शासनाकडे केली आहे.
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व त्यांना पौष्टीक आहार मिळावे, यासाठी शिक्षण विभाग हा पुरवठा करीत आहे. मात्र, पुरवठा होत असलेले तांदुळ, तिखट, हळद व अन्य कडधान्य मालाचा साठा अत्यंत निकृष्ठ दर्जाचा असूनही त्याकडे लक्ष दिल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांना उपलब्ध साठ्यानुसार अन्न शिजवून दिल्या जात आहे.
शहर व ग्रामीण भागात योजनेचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यात एकसुत्रीपणासाठी केंद्रीय किचन योजना शासनाचे विचाराधीन आहे. परंतु ही योजना लागू होईस्तोवर ग्रामीण भागातील शाळांना महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत हे धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनता आहारात वापरत नाही अशा प्रकारच्या तांदळाचा पुरवठा शाळांमध्ये केल्या जात आहे. तसेच वटाणा किंवा चवळी, मिरची पावडर, हल्दी पावडर, जिरे, मोवरी हे सर्व साहित्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. चवळी व वटाणा किड लावून छिद्र पडलेले असतानाही नाईलाज म्हणून शाळांना स्विकारावा लागतो व तेच शिजवून चारावे लागते. महिना संपल्यानंतर मालाचा पुरवठा केल्या जातो. या प्रकाराकडे शासन, प्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bad Nutrition School Nutrition Supplies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.