बाबूजींनी ‘लाेकमत’च्या माध्यमातून राज्यभर लाेकचळवळ उभारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 05:00 AM2022-07-03T05:00:00+5:302022-07-03T05:00:20+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात २८ जणांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी समर्पण ब्लड बँकेचे संचालक ओंकार नखाते, डाॅ. हेमा भाेंगाडे, संदीप साखरवाडे, पल्लवी गिलाेरकर, प्राची गाढवे, नमीषा चिंधालाेरे यांनी सहकार्य केले.

Babuji started a state-wide Lak movement through 'Lakmat' | बाबूजींनी ‘लाेकमत’च्या माध्यमातून राज्यभर लाेकचळवळ उभारली

बाबूजींनी ‘लाेकमत’च्या माध्यमातून राज्यभर लाेकचळवळ उभारली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी राजकीय क्षेत्र गाजविले. ‘लाेकमत’च्या माध्यमातून त्यांनी राज्यभर लोकचळवळ उभारली. तळागाळातील नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन जनसामान्यांच्या समस्या साेडविल्या, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी केले.
लाेकमत समूहाचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित शनिवारी येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात आयाेजित आदरांजली सभा आणि रक्तदान शिबिरप्रसंगी ते बाेलत हाेते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषद सदस्य यशवंत साेनकुसरे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चाैधरी, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, याेगेश पडाेळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डाॅ. कार्तिक पणीकर, रासेयाेचे कार्यक्रम अधिकारी भाेजराज श्रीरामे उपस्थित हाेते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात २८ जणांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी समर्पण ब्लड बँकेचे संचालक ओंकार नखाते, डाॅ. हेमा भाेंगाडे, संदीप साखरवाडे, पल्लवी गिलाेरकर, प्राची गाढवे, नमीषा चिंधालाेरे यांनी सहकार्य केले. यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग नाेंदविला. या कार्यक्रमाचे आयाेजन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विकास ढाेमणे यांच्या सहकार्याने करण्यात आले हाेते.  संचालन बालविकास मंचचे संयाेजक ललित घाटबांधे यांनी केले तर आभार सखी मंचच्या संयाेजिका सीमा नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमाला लाेकमत जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, शाखा व्यवस्थापक माेहन धवड, लाेकमत समाचार जिल्हा प्रतिनिधी शशिकुमार वर्मा, संपादकीय विभागाचे इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, युवराज गाेमासे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित हाेते.  

माणुसकीला साद घालणारा उपक्रम - जिल्हाधिकारी
- जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, मी अनेक वर्षांपासून लाेकमतचा रक्तदान हा उपक्रम सातत्याने बघत आलाे आहे. हा खरेच माणुसकीला साद घालणारा व प्रेरणादायी प्रवास आहे. लाेकमतच्या माध्यमातून झालेली जनसेवा अविस्मरणीय आहे, असे त्यांनी सांगितले. हा सामाजिक वसा सदैव समाेर राहावा, अशी मी सदीच्छा व्यक्त करताे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी लावलेल्या ‘लाेकमत’च्या राेपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. लाेकमतचे सामाजिक क्षेत्रातील याेगदान वाखणण्याजाेगे आहे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- रक्तदान शिबिरात शिवराम पडाेळे, अजय देवकते, जितेंद्र किरसान, डाॅ. भीमराव पवार, प्रशांत भाटे, डाॅ. अनिकेत चिचामे, रुगवेद साठवणे, भाेजराज श्रीरामे, राजेंद्र राकडे, प्रवीण कामडी, सतपाल माहुले, कुंदन काेडापे, शिवशंकर वराडे, रमेश चाफले, विशाल दलाल, साेहन मालखंडाळे, यश साेनवणे, कुणाल बावनकर, संदेश सेलाेकर, देवदास पडाेळे, सूरज कऱ्हाडे, अनिकेत नागदेवे, हर्षल मडामे, सूरज निपाणे, तन्मय ठाकरे, विवेक गायधने, चेतन कवाले यांनी रक्तदान केले. समर्पण ब्लड बँकेच्यावतीने त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: Babuji started a state-wide Lak movement through 'Lakmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.