रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता
By Admin | Updated: May 3, 2017 00:37 IST2017-05-03T00:37:23+5:302017-05-03T00:37:23+5:30
प्रामाणिकता शब्दात विश्वासहार्यता दिसून येते. अशी माणसे दुर्मिळ झाली. दुमिळामुळे प्रामाणिकतेचे महत्व वाढते.

रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता
तुमसर रोड स्थानकावरील घटना : रोख, सोन्यांच्या दागिन्याची बॅग परत केली
तुमसर : प्रामाणिकता शब्दात विश्वासहार्यता दिसून येते. अशी माणसे दुर्मिळ झाली. दुमिळामुळे प्रामाणिकतेचे महत्व वाढते. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर एका महिलेची बॅग विसली. ती पुढच्या प्रवासाकरिता रवाना झाली. गाडी सुटल्यावर तिच्या लक्षात आले. दरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवानांनी ती बॅग स्वत:कडे सुरक्षित ठेवली. दुसऱ्या गाडीने ती महिला परत आल्यावर ती बॅग तिच्या स्वाधीन करण्यात आले. प्रामाणिकता आजही जिवंत असल्याचे या घटनेवरुन दिसून येते.
सविता संतोष पडोळे ही महिला तुमसर रोड रेल्वेस्थानकावरुन अमरावती ला जाण्याकरिता प्लॅटफार्मवर आल्या. शालीमार एक्सप्रेसने त्या प्रवास करणार होत्या. प्लॅटफार्मवर गाडी येताच त्या प्रवाशी डब्यात बसल्या, पंरतु प्लॅटफार्मवर त्या एक बॅग विसल्या. त्या बॅगमध्ये सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची नथ, नगदी तथा मोबाईल होता. धावत्या गाडीत पडोळे यांनी लक्षात आले. पंरतु काय करावे हे त्यांना कळेनासे झाले.
दरम्यान रेल्वेस्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे सुरक्षा जवान ईशांत दिक्षीत, श्यामकुंवर याना ती बॅग दिसली. त्यांनी बॅगची तपासणी केल्यावर त्यांना सोन्याचे दागीने, रोख रक्कम दिसली.
सदर बॅग रेल्वे सुरक्षा कार्यालयात जमा करण्यात आली. महिलेच्या बॅगमधील मोबाईलने इतर नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर पडोळे यांना माहिती मिळाली. सविता पडोळे ह्या मुंबई -हावडा मेलने पुन्हा तुमसर रोड स्थानकावर परत आल्या. त्यानंतर रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पडोळे यांनी ती बॅग परत दिली. यामुळे पडोळे अत्यंत भारावून गेल्या. प्रामाणिकता आजही जिवंत आहे असे उद्गार त्यांनी सुरक्षा बलाच्या जवानाबाबतीत काढले. प्रवाशी गाडी आल्याने घाईत बॅग रेल्वे स्थानकावर विसरल्याचे सविता पडोळे यांनी यावेळी सांगितले.
तुमसर रोड येथील रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविता पडोळे यांना ती बॅग परत करण्यात आली. यावेळी इशांत दिक्षीत, संदीप, जितेद्र वाघमारे, श्याम बिहारी, रेल्वे समिती सदस्य एम. डी. आलावान सह कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)