आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित
By Admin | Updated: July 17, 2014 23:55 IST2014-07-17T23:55:05+5:302014-07-17T23:55:05+5:30
जिल्ह्यातील खासगी अनुदानित विजाभज आरश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर व वसतीगृह कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यापासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित
उपासमारीची वेळ : आॅनलाईन प्रक्रिया ठप्प
भंडारा : जिल्ह्यातील खासगी अनुदानित विजाभज आरश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर व वसतीगृह कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यापासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारेखला वेतन मिळण्याकरीता मे २०१३ पासून लागू करण्यात आलेली समाज सेवार्थ आॅनलाईन प्रणाली पुर्णत: विफल ठरली आहे.
भंडारा जिल्ह्यात समाजकल्याण विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्यण, भंडारा यांच्या नियंत्रणात ६ प्राथमिक व १ माध्यमिक आश्रमशाळा अशा एकूण ७ विजाभज जातीच्या आश्रमशाळा आहेत. यातील १ प्राथमिक आश्रमशाळा विमाप्रची आहे.
या आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यपासून वेतन मिळाले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यावंर उपासमारीची पाळी आली आहे. सहा महिने वेतन न मिळाल्यामुळे, या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या पगारतारण कर्जावर लाखो रूपयांच्या व्याजाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागणार आहे. आयकराची रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर मोठा दंड बसणार आहे.
या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळण्याकरीता समाजकल्याण विभागाने समाज सेवार्थ आॅनलाईन प्रणाली मे २०१३ पासन सुरू केली. पण ही प्रणाली पुर्णत: विफल ठरली आहे. त्यामुळे अगोदरची आॅनलाईन प्रणालीच चांगली होती, असे कर्मचारी म्हणत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे वेतन परत आॅनलाईन प्रणालीनेच पाठविले आहे. पण हे वेतनबिल मंजूर झाल्याशिवाय पुढचे महिन्याचे वेतनबिल पाठविले जावू शकत नसल्यामुळे वेतनबिल पाठविण्याचे कामच पुर्णत: ठप्प पडले आहे.
या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरीता निधी नसल्याची माहिती आहे. या आश्रमशाळांचे नियंत्रण करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला होताच पण आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरीता कार्यालय प्रयत्न का करीत नाही, हे एक कोडच ठरले आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांना लवकरात लवकर वेतन देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)