कला शाखेच्या तुकड्या धोक्यात
By Admin | Updated: September 13, 2014 23:39 IST2014-09-13T23:39:41+5:302014-09-13T23:39:41+5:30
विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे वाढल्याने जिल्ह्यात कला शाखेचे भवितव्य अधांतरी आले आहे. यावर्षी अनेक ठिकाणी कला शाखेचे ११ व १२ वीचे वर्ग तुटल्याने अनेक प्राध्यापक अतिरिक्त झाले आहेत.

कला शाखेच्या तुकड्या धोक्यात
कोंढा (कोसरा) : विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे वाढल्याने जिल्ह्यात कला शाखेचे भवितव्य अधांतरी आले आहे. यावर्षी अनेक ठिकाणी कला शाखेचे ११ व १२ वीचे वर्ग तुटल्याने अनेक प्राध्यापक अतिरिक्त झाले आहेत.
विज्ञान शाखेत ३५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश शाळेचे व्यवस्थापन देत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे वाढला आहे. यामुळे कला शाखेच्या तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे. नुकताच भंडारा येथे ज्यु. कॉलेजच्या वर्ग ११ व १२ वीच्या तुकड्यांचे शिबिर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतले. तेव्हा त्या शिबिरात जिल्ह्यातील ज्यु. कॉलेजचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, हे चित्र समोर आले.
वास्तविक कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासनाने गावोगावी विद्यालयास वर्ग ११ व १२ च्या तुकड्यांची मान्यता दिली आहे. विज्ञान शाखेचे कायम विनाअनुदान वर्गांना अनेक ठिकाणी मान्यता मिळाली आहे. तसेच विज्ञान शाखेत प्रवेश ५० टक्क्यावरून ३५ टक्क्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे कला शाखेच्या प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे.
वर्ग ११ व १२ पैकी एक वर्ग कमी झाले तर प्राध्यापक अर्धवेळ होऊन अर्धेवेतन मिळते. अशावेळी पूर्णकालीन प्राध्यापकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणे आवश्यक आहे. कला शाखेत विद्यार्थीसंख्या कमी असल्यास हजेरी अट पूर्ण न झाल्यास पिनलकटचे भूत प्राध्यापकांवर आहे. तरी कला शाखेचे वर्ग तुटले तरी प्राध्यापकांचे वेतन थांबवू नये. यासंबंधी शिक्षण उपसंचालकाने योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच प्राध्यापकांच्या संघटनांनी अतिरिक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षण मिळवून देणे आवश्यक आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी व्यावसायीक शिक्षणावर भर दिला आहे. त्यातून रोजगारासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी नियंत्रणात येईल. (वार्ताहर)