भंडारातील महोत्सवात दरवळला रानभाज्यांचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:15+5:30
भंडारा तालुका कृषी कार्यालयात मंगळवारी रानभाजी महोत्सव आयोजित होता. जिल्हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. या जंगलात अविट चवीच्या अनेक रानभाज्या आहेत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागात या भाज्यांची चव चाखली जाते. अलिकडे भंडारा शहरातील रस्त्यांवरही काही ग्रामीण मंडळी या भाज्या घेऊन विक्रीसाठी बसलेले दिसतात. मात्र शहरी ग्राहकांचा सात्या वगळता इतर भाज्यांना फारसा प्रतिसादही मिळत नाही.

भंडारातील महोत्सवात दरवळला रानभाज्यांचा सुगंध
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळा आला की अविट चवीच्या रानभाज्यांचा घमघमाट येऊ लागतो. बाजारात या रानभाज्या दिसल्या की जुन्या जाणत्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गावखेड्यात खाल्लेल्या या रानभाज्यांची चव अनेकांच्या जीभेवर रेंगाळत राहते. अशाच अविट चवीच्या आणि औषधी गुणधर्माच्या अनेक भाज्या मंगळवारी भंडारात एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी खवय्यांना मिळाली. निमित्त होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाचे.
भंडारा तालुका कृषी कार्यालयात मंगळवारी रानभाजी महोत्सव आयोजित होता. जिल्हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. या जंगलात अविट चवीच्या अनेक रानभाज्या आहेत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागात या भाज्यांची चव चाखली जाते. अलिकडे भंडारा शहरातील रस्त्यांवरही काही ग्रामीण मंडळी या भाज्या घेऊन विक्रीसाठी बसलेले दिसतात. मात्र शहरी ग्राहकांचा सात्या वगळता इतर भाज्यांना फारसा प्रतिसादही मिळत नाही. मात्र कृषी विभागाने संपूर्ण जिल्हाभर तालुकाठिकाणी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले. एवढेच नाही तर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव घेऊन विविध भाज्या उपलब्ध करून दिल्या. या भाज्या खरेदी करण्यासाठी शहरी मंडळींनी गर्दी केली होती. प्रत्येक भाजीची महती आणि औषधी गुणधर्म ऐकून शहरी ग्राहक अचंभित होत होते. बाजारात मिळणाऱ्या दोन-चार रानभाज्या पाहणाºया शहरी ग्राहकांना एकाच छताखाली ३० ते ३५ विविध प्रकारच्या भाज्या दिसून आल्या. अनेक भाज्यांची तर नावेही माहित नव्हती. तेथे आलेल्या ग्रामीणांनी या भाज्यांचीच नावे सांगितली नाही तर त्या भाज्या तयार कशा करायच्या याची माहिती सांगितली.
पातूर, तरोटा, केना, खापरखुटी, तांदूळका
पातूर, पातर, तरोटा, केना, इन्सूलीनची पाने, बांबू कोंब, भूईआवळा, वराकली, खापरखुटी, काटवल, कुड्याची फुले, अळू, चंदनबटवा, टाकळा, सुरणकंद, शेरेडिरे, फाशाची पाने, आंबाडी यासह विविध रानभाज्या या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होते. प्रत्येक रानभाजीचे औषधी गुणधर्म वेगवेगळे असून त्याची चवही अवीट असते. तरोटा ही भाजी सर्वत्र आढळत असून ती त्वचा रोगासाठी गुणकारी मानली जाते. चंदनबटव्यामध्ये अ जीवनसत्व, कॅल्शीयम, फॉस्पेट, पोटॅशियम अशी अनेक गुणधर्म असल्याचे यावेळी सांगण्यात आले.