शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द बॅक वॉटरमुळे प्रभावित ४२ गावे प्रकल्पबाधित की पूरबाधित ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:46 IST

Bhandara : शेती पाण्याखाली, घरांच्या भिंतीनाही टेकले पाणी; प्रकल्प पूर्ण भरला पण चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे इंदिरा सागर प्रकल्प (गोसे प्रकल्प) एकदाचा १०० टक्के भरल्याचा आनंद जलसंधारण विभागात साजरा होत असला तरी, दुसरीकडे मात्र या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. जी गावे आणि शेती या प्रकल्पाच्या थेट पाण्याखाली आलीत, अशा १८९ गावांना प्रकल्पबाधित ठरवून पुनर्वसनही झाले आहे. तर ४२ गावांना बैंक वॉटरचा फटका बसत असताना ही गावे प्रकल्पबाधीत की पूरबाधीत अशा तांत्रिक कात्रीत अडकली आहेत.

आम्हालाही प्रकल्पबाधित ठरवून पुनर्वसनासह सुविधा द्याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र जलसंधारण विभाग आणि इंदिरा सागर प्रकल्पाचे अधिकारी त्यांना प्रकल्पबाधित मानायला तयार नाहीत. त्यामुळे या ४२ गावांमधील वाद कायम आहे. आता प्रकल्पाचे पाणी वाढून थेट शेती आणि घरांपर्यंत पोहोचल्याने भविष्यात हा वाद पेटण्याची अधिक शक्यता आहे.

५६ व्याप्ती किलोमीटर असलेल्या इंदिरा सागर प्रकल्पामुळे मुख्यतः नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण बाधित गावांची संख्या १८९ आहे. तर, भंडारा जिल्ह्यात १०४ गावे बाधित आहेत. पूर्णतः बाधितपैकी भंडारा जिल्ह्यातील ३४ पैकी ३२ गावांचे तर नागपूर जिल्ह्यात ५१ पैकी ५० गावांचे पुनर्वसन झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील खापरी आणि नेरला, नागपूर जिल्ह्यातील रूयाड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सायमारा (चक) आणि सावंगी (दीक्षित) अशा पाच गावांचे पुनर्वसन बाकीच आहे.

नियम काय म्हणतो?

धरणामुळे अडचणीत आलेल्या गावांना प्रकल्पबाधित अथवा पूरबाधित ठरविताचा नियम पेचात पाडणार आहे. थेट धरणामुळे होणारे बाधित हे बांधकामामुळे विस्थापित झालेले किंवा जमीन गमावलेले नागरिक असतात, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पूरपरिस्थितीमुळे, धरणांमधून जास्त विसर्ग सोडल्याने घरे, शेती किंवा मालमत्ता नष्ट झालेल्यांना पूरबाधित संबोधले जाते.

संवेदनशीलपणे पाहू : जिल्हाधिकारी सावनकुमार

या संदर्भात जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ही गावेही बाधितच असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे ते म्हणाले. गावकऱ्यांची समस्या लक्षात घेता हा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार आहोत. बॅक वॉटरची निश्चित करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू केले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महसूल, जलसंधारण आणि पूनर्वसन विभाग अशा तिघांमिळून वरिष्ठ पातळीवर तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले.

मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष

  • बाधित आणि अल्पबाधित ठरविलेल्या गावांना नियमानुसार पुनर्वसन योजनेत सहभागी केले जात असले तरी खरा प्रश्न 'त्या' ४२ गावांचा आहे.
  • प्रकल्पाच्या बॅक वॉटरची झळ बसत असूनही थेट प्रकल्पात २ नसल्याचा आधार घेऊन या गावांना आता पूरबाधित दाखविण्याचा प्रयत्न जलसंधारण विभागाकडून होत आहे.
  • २०२२ मध्ये प्रकल्प १०० टक्के भरवून टेस्टिंग केल्यावर भविष्यातील गंभीर स्थितीची चाहूल गावकऱ्यांना लागली होती. तेव्हापासूनच ही गावे प्रकल्पबाधित ठरविण्याची मागणी करीत आहेत. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले.
English
हिंदी सारांश
Web Title : Gosekhurd Backwater: 42 Villages Project-Affected or Flood-Affected? Uncertainty Persists.

Web Summary : Gosekhurd project's backwater impacts 42 villages, causing displacement concerns. Villagers demand project-affected status with resettlement. Authorities hesitate, classifying them as flood-affected. A drone survey is initiated to resolve the dispute, aiming for a solution involving revenue, water conservation, and rehabilitation departments.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पWaterपाणी