शेतीसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजूर करा

By Admin | Updated: December 16, 2015 00:43 IST2015-12-16T00:43:46+5:302015-12-16T00:43:46+5:30

तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत.

Approve the Lift Irrigation Project for Agriculture | शेतीसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजूर करा

शेतीसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजूर करा

राजेंद्र पटले यांची मागणी : जलाशयाची क्षमता वाढविण्यावर भर
भंडारा : तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत. मात्र त्या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात होत नाही. परिणामी भंडारा जिल्ह्यातील ज्या गावांना प्रकल्पांतर्गत सिंचन मिळत नाही अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात यावे, अशी मागणी किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी केली आहे.
बावनथडी प्रकल्प अजुनपर्यंत पुर्णत्वास आले नाही. मात्र या प्रकल्पामुळे लेंडेझरी, खापा, आलेसूर, लोंढा, लवादा, मंगरली, गोबरवाही, सितासावंगी, पवनारखारी, भोंडकी, धुडरी, खंडाळा, सौदेपुर व करडी क्षेत्रात बावनथडी सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन योजना तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. करडी हा क्षेत्र वैनगंगा नदीच्या काठावर आहे. त्यामुळे सदर प्रकल्प या परिसरात कार्यान्वीत करण्याची गरज आहे.
याकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजेंद्र पटले यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे पत्र व्यवहारही केला. सोंड्याटोला लिफ्ट सिंचन योजनेमुळे चांदपूर जलाशयाची क्षमता वाढविण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अभियांत्रिकी स्तरावर अभ्यास करून लिफ्ट सिंचन प्रकल्प तयार करण्याची गरज आहे. सदर सिंचन प्रकल्प निर्माण झाल्यास तालुक्यासह अन्य क्षेत्रालाही या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल. शासनाने यासंदर्भात मागणी पुर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पटले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांच्या समस्येकडे कानाडोळा केल्यास त्या मी खपवून घेणार नाही, असा इशाराही पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Approve the Lift Irrigation Project for Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.