शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

रेलयात्री सेवा समितीचे प्रफुल पटेल यांना निवेदन

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

रेलयात्री सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन समितीच्या वतीने रेल्वे समस्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले.

भंडारा : रेलयात्री सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन समितीच्या वतीने रेल्वे समस्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले.भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर गीतांजली व आझाद हिंद एक्स्प्रेसचा थांबा, तुमसर येथे काही जलद गाड्यांचे थांबे, नागरिकांच्या सोयीसाठी भंडारा शहरात तिकीट आरक्षणाची सोय, रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीची स्थापना त्यांच्या पुढाकाराने व संस्थेच्या प्रयत्नाने झाली.भंडारा शहर शटल ट्रेनची समितीची मागणीची दखल घेत त्यांनी भंडारा येथे आपल्या उपस्थितीत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व समिती पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून केली होती. त्यानंतर भंडारा ते भंडारा रोड शटल ट्रेनसाठी रेल्वे लाईनची तीनदा तांत्रिक तपासणी करण्यात आली होती. यासाठी त्यावेळी २२ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात येऊन १९ कोटी ८५ लक्ष रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. परंतु तो मान्य झाला नव्हता. परंतु प्रस्ताव पुन्हा पाठविल्यास विचार करण्यास येईल, असे रेल्वे बोर्डाने म्हटले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. समितीने यासंबंधी रेल्वेमंत्री जनप्रतिनिधी व रेल्वे बोर्ड, यांच्याकडे सातत्याने शटल ट्रेनची मागणी उचलून धरली. परंतू रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधींच्या निरंतर उपेक्षेमुळे पुढे सरकले नाही.शटल ट्रेनचा प्रश्न अधांतरीच आहे. भंडारा येथे २६ जलद गती गाड्यांचे थांबे नाहीत. बिलासपूर-पुणे व इतर काही गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी प्रफुल पटेल यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. विद्यमान खासदारांकडेही निवेदने देण्यात आली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन खासदाराच्या कारकिर्दीत बिलासपूर-पुणेचा थांबाही मिळू नये व १५ लक्ष लोकसंख्या व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहराला काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळाले नसल्याची खंत रेल्वे यात्रा समितीने यावेळी खासदार पटेल यांच्याजवळ व्यक्त केली. यावेळी रमेश सुपारे, वरियलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)