वृद्ध वडिलांवर कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाने केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:51+5:30

जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड घेऊन आला. कोणताही विचार न करता त्याने थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला.

An old man was stabbed to death by his son | वृद्ध वडिलांवर कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाने केले ठार

वृद्ध वडिलांवर कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाने केले ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले.
जानबा गोगलू मेश्राम (७०) असे मृत वडिलांचे नाव आहे. तर देवेंद्र जानबा मेश्राम (३३) असे आरोपी मुलाचे नाव आहे. जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहतात. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड घेऊन आला. कोणताही विचार न करता त्याने थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. घाव वर्मी बसल्याने जानबा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि मृत्युमुखी पडले. 
घरी एकच आरडाओरडा झाला त्यावेळी पाहुणी म्हणून आलेली त्याची बहीण श्यामकला शहारे रा. महागाव ही मध्ये आली. त्यावेळी तिलाही मारहाण केली. या घटनेची गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी देवेंद्रला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३२३ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शनिवारी जानबा मेश्राम यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी साकोली येथे करण्यात आली. त्यानंतर सोनमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

पाहुणी आलेल्या बहिणीलाही मारहाण
- देवेंद्र मेश्राम याची बहीण तालुक्यातील महागाव येथून पाच दिवसापूर्वी उन्हाळ्याच्या पाहुणपणासाठी माहेरी सोनमाळ येथे आली होती. वडिलाचा तिच्या डोळ्यादेखत खून झाला. भावाला जाब विचारताच त्याने बहिणीच्या डोक्याचे केस पकडून तिच्या गालावर व पाठीवर लाथा बुक्याने मारहाण केली.

 

Web Title: An old man was stabbed to death by his son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.