तीन मुलींना शिलाई मशीनचे वाटप

By Admin | Updated: January 10, 2016 00:39 IST2016-01-10T00:39:39+5:302016-01-10T00:39:39+5:30

शहरातील मुस्लिम लायब्ररीच्यावतीने मुस्लिम समाजातील तीन गरीब मुलींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

Allotment of sewing machines to three girls | तीन मुलींना शिलाई मशीनचे वाटप

तीन मुलींना शिलाई मशीनचे वाटप

मुस्लिम लायब्ररी मंडळाचा उपक्रम : कार्यक्रमात समाजबांधवांना मार्गदर्शन
भंडारा : शहरातील मुस्लिम लायब्ररीच्यावतीने मुस्लिम समाजातील तीन गरीब मुलींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.
सामाजिक दायीत्व जोपासताना मुस्लिम लायब्ररीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी एका होतकरुला रिक्षा भेट देऊन त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. याच अनुषंगाने यावर्षी समाजातील गरीब घरच्या मुलींना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
विविध कार्यक्रम साजरा करताना त्यावर होणारा खर्चापैकी काही निधी समाजोपयोगी साहित्य वितरीत करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या दृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला. यावेळी मुस्लिम लायब्ररीचे सचिव सैय्यद सोहेल, अध्यक्ष नईमुर्रहीम खान, यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.
लायब्ररीचे माजी अध्यक्ष मो.अब्दुल मशीर पटेल, प्यारे पाशा पटेल, जनाब अकबर खान व नईमुर्रहीम खान यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी अमानुल्लाह खान, शेख नवाब, अजहर कुरैशी, शमशाद खान, नईम खान पठाण, शकील अहमद, ईर्शाद जमा, शाकीर हुसैन, माबूद खान, सैय्यद मोबील, आसित अली खान, जिया पटेल,महेमुद खान, वाजीद अली खान, अजिम पटेल, करीम खान आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Allotment of sewing machines to three girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.