शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

मतदानात साकोली क्षेत्र पुढे; भंडारा मागे

By admin | Updated: October 16, 2014 23:19 IST

राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल बुधवारला शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया आटोपली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन क्षेत्रातील ५३ उमेदवारांचे

एकूण मतदान ७०.९७ टक्केभंडारा : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल बुधवारला शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया आटोपली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन क्षेत्रातील ५३ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले. या निवडणुकीत एकूण ६ लाख ५१ हजार २६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी ७०.९७ ईतकी आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा यावेळी १.९५ टक्क्यांनी मतदान वाढले असून साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये ७३.७० टक्के सर्वाधिक तर भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये ६८.२२ टक्के कमी मतदान झाले. तुमसर क्षेत्रात ७१.४४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया आटोपताच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे, ती रविार १९ आॅक्टोबरच्या मतमोजणीच्या दिवसाची. यादिवशी ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. भंडारा जिल्ह्यात ९ लाख १७ हजार ६२२ मतदारसंख्या आहे.यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ६७ हजार ३५७ तर महिला मतदारांची संख्या ४ लक्ष ६७ हजार ३५७ इतकी आहे. यापैकी ३ लाख ३४ हजार ५१० पुरुष तर ३ लाख १६ हजार ७५६ महिलांनी मतदान केले. एकूण ६ लाख ५१ हजार २६६ मतदारांनी मतदान केले. विधानसभानिहाय मतदानतुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख १,१२२ (७१.४४ टक्के), भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख ३२,२३८ (६८.२२ टक्के), साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख १७,९०६ (७३.७० टक्के) मतदान झाले.यापैकी साकोली मतदारसंघात ७३.७० टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले असून भंडारा मतदारसंघात ६८.२२ टक्के कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीत महिलांपेक्षा पुरुषांची टक्केवारी अधिक दिसून आली. पुरुषांची टक्केवारी ७१.५७ इतकी तर महिलांची टक्केवारी ७०.३५ इतकी आहे. मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व ईव्हीएम त्या-त्या क्षेत्रातील ‘स्ट्राँग रुम’ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ‘स्ट्राँग रुम’ परिसरात शस्त्रधारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मागील २५ दिवसांपासून दिवसांपासून प्रचारात व्यस्त असलेले उमेदवार आता निवांत झाले आहेत. गावोगावी सभा, प्रचारांचा धुराळा, बैठका आदी कामाचा ताण निवळला असून कार्यकर्तेही सुस्तावले आहेत. आता कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील, कोण बाजी मारेल, याचीच शहरासह ग्रामिण भागात गोळाबेरीज करणे सुरु आहे. त्या आधारावर शर्यती लावण्याचे प्रमाण वाढले आहे. या शर्यती लाखोंच्या घरात असून मतदारांच्या नजरा आता रविवारच्या मतमोजणीकडे लागलेल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)