शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गावातच मिळणार प्रशासकीय, व्यावसायिक सेवा

By admin | Updated: September 7, 2016 00:43 IST

विविध दाखले, प्रमाणपत्रांसह प्रशासकीय सेवा ते रेल्वे, बस आरक्षणासह इतरही बँकिंग सेवा आता ग्रामपंचायत सेवेतच उपलब्ध होणार आहेत.

‘आपले सरकार सेवा केंद्र’ : विविध दाखले, प्रमाणपत्रांसह सेवाही मिळणारतुमसर : विविध दाखले, प्रमाणपत्रांसह प्रशासकीय सेवा ते रेल्वे, बस आरक्षणासह इतरही बँकिंग सेवा आता ग्रामपंचायत सेवेतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्राम पंचायतीमध्येच आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. साधारणपणे १५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये किमान एक स्वतंत्र केद्र उभारण्यात येणार आहे. पंचायत राज संस्थांच्या काराभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता पादर्शकता आणण्यासाठी सध्या केंद्र राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामस्थांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेली सेवा दाखले, व्यावसायिक सेवा गावतच कालबद्ध स्वरुपात मिळावी, यासाठी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापन एका कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम पंचायत क्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योजकांची केंद्र चालक म्हणून निवड करण्यात येणार आहे. केंद्राला ग्राम पंचायतीची जागा, विद्युत इंटरनेट, कनेक्टिव्हिटी वापराची मुभा राहील. केंद्रात मिळतील या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध विभागांमार्फत मिळणाऱ्या सेवांसह संगणकीकृत दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यु नोंदणी, रहिवासी दाखला, विवाहाचा दाखला, नोकरी व्यावसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र पत्र, नादेशप्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, योजनेचा फायदा घेतला नसल्याने प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकाम अनुमती प्रमाणपत्र, नळ जोडणी अनुमती प्रमाणपत्र निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र हयातीचा दाखला, अशी ही सुविधा मिळणार आहे. १५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राम पंचायतींना केंद्रासाठी उत्सुक असल्यास त्यांना आर्थिक भर द्यावा लागणार आहे. भौगोलिक स्थिती ग्राम पंचायतीची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन ग्राम पंचायतीचे गट तयार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) व्यावसायिक सेवा उपलब्ध होणारकेंद्रामध्ये व्यावसायिक सेवाही उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये रेल्वे, बसचे आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅकिंग सेवा, आर्थिक समावेशन ई-कॉर्मस, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हफ्ता भरणे, पासपोर्ट आदी सेवांचा समावेश राहणार आहे. या सेवासाठी नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागते. त्या याच ठिकाणी मिळणार आहेत. बीडीओंवर राहणार जबाबदारी आपले सेवा केंद्राबाबत गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. केंद्रामध्ये ई-पंचायत प्रकल्प इतर अनुषंगिक योजनांबाबतची माहिती मंडळात संकेत स्थळावर भरण्यासाठी अद्ययावतीसाठी उपलब्ध करुन देणे, संकलन करणे, तपासणी करणे, प्राथमिक अहवाल घेण्याची जबाबदारी राहणार आहे.