रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या सात ट्रकवर प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:25+5:30
तुमसर शहरालगतच्या बाम्हणी रेतीघाटाला प्रशासनाकडून परवानगी नसतांना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती डंपींग करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. ट्रकद्वारे वाहतूक कधी होते याच्या मार्गावर असताना बाम्हणी डंपींगवरून ट्रकद्वारे रेती भरून नेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी थेट रेतीघाट गाठून आपल्या चमूसह घाट ट्रकवर कारवाही करून ट्रक जप्त केले.

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या सात ट्रकवर प्रशासनाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील बाम्हणी रेती घाटातून रेतीचे उत्खनन करून अवैध रेतीची वाहतूक करणाºया सात ट्रकवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात आली. ब्राम्हणी येथे रेतीची उचल होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना मिळताच त्यांनी आपल्या चमुसोबत रेतीघाट गाठून अवैध वाहतूक करणाºया सात ट्रकवर कारवाही करून त्यांना तहसील कार्यालय तुमसर येथे जमा केले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
तुमसर शहरालगतच्या बाम्हणी रेतीघाटाला प्रशासनाकडून परवानगी नसतांना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेती डंपींग करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. ट्रकद्वारे वाहतूक कधी होते याच्या मार्गावर असताना बाम्हणी डंपींगवरून ट्रकद्वारे रेती भरून नेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी थेट रेतीघाट गाठून आपल्या चमूसह घाट ट्रकवर कारवाही करून ट्रक जप्त केले.
महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईत ट्रक क्र एम. एच. ४० वाय. ५३३३, एम.एच. ४० ए. के. ४५६७, एम.एच. ३५ ए.जे. १८१०, एम.एच. ३५ ए. जे. १८९१, एम.एच. ४० ए.के. ५१७५, एम. एच. ३५ ए.जे. १५१०, एम.एच.३५ ए. जे. ९९१० या ट्रकचा समावेश आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.