शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षक म्हणतात, दिवसच ढकलायचे आहेत

By admin | Updated: June 12, 2017 00:33 IST

खासगी अन् जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्थिती तळ्यात मळ्यात झाली आहे.

व्यथा : सकारात्मक विचारांची गरजराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : खासगी अन् जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्थिती तळ्यात मळ्यात झाली आहे. विशेषत: खासगी शाळांतील शिक्षकांच्या मनातील नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता पुढील दिवस ढकलायचे आहेत. या प्रतिक्रियेतून अतिरिक्त शिक्षक व्यथित झाल्याचे दिसून येत आहे.शिक्षण क्षेत्रात खुली स्पर्धा सुरु केली आहे. इंग्रजी शाळांची वाढती संख्या, स्वयं अर्थसहाय्यीत शाळा, लहान परिवाराची वाढती संस्कृती, विकतच्या शिक्षणाला महत्व, इंग्रजीतून शिक्षण घेणे लाभदायक आदी बाबींमुळे मराठी शाळा ओस पडायला लागली आहेत. पटसंख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. स्वाभाविकच दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत भर पडत आहे. त्यातही रिक्त पदांची संख्या कमी. यामुळे अतिरिक्त शिक्षकांची अवस्था घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे. अतिरिक्त शिक्षकांना सोसावा लागणारा मानसिक ताण नकारात्मक विचाराकडे नेत आहे. त्यांच्या व्यथीत मनातून आपसुकच बाहेर पडते, आता दिवस असेच ढकलायचे आहेत. काही शिक्षक स्वेछानिवृत्ती घेतलेली बरी असेही मानसिक त्रासातून निर्माण झालेल्या प्रतिक्रिया उमटवत आहेत. अशाच काही अतिरिक्त शिक्षकांनी लोकमतजवळ प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.सूर्याचे परिवर्तन होते. त्यामुळेच दिवस रात्र होत असते. दिवस पुढे आपोआप ढकलत जातात. त्याला कोणाची आवश्यकता नसते. पण, दिवस ढकलत म्हणायची शिक्षकांवर का वेळ आली याचेही आत्मपरिक्षण केले जावे. यात सगळा दोष शिक्षकांवर जात नाही. शासनाची शैक्षणिक धोरणही याला जबाबदार आहेत. पण,दुसऱ्यांकडे निर्देश करून आपला दोष झाकायचा हा प्रयत्न करणे चुकीचे आहे. शिक्षण क्षेत्रातील खुल्या स्पर्धेत आपणमागे पडतो काय? हा प्रश्न प्रत्येक शिक्षकांनी स्वत:ला करावा. शासनातर्फे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहे. त्यात शिक्षण १०० टक्के समरस होत नाही. मग तो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्य), स्व.मुल्यमापनाची शाळा सिद्धी मनावर घेत नाही. त्या दिशेने काम करीत नाही. आपण स्पर्धेत कमी पडत आहोत हे सत्य स्वीकारले पाहिजे. कुठे कमी आहोत याचे संशोधन व्हावे. सकारात्मक विचार ठेवावा. जिल्ह्यात खेड्यात उत्कृष्ट शाळा निर्माण केली जावू शकते. याचा विचार व्हावा. खराशी शाळेने केले, कुमठे बिट आणि अनेक शाळा आहेत जिथे अतिउत्कृष्ट शिक्षण मिळते. खुल्या स्पर्धेत टिकविण्यासाठी दोन पाऊल पुढे जाण्यासाठी सर्व स्तरावर आदर्श ठरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. निर्धाराने, नेटाने पुढे गेले पाहिजे. इंग्रजी शाळांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आधी गुणवत्ता, प्रबळ मानसिकता, ध्यास, त्याग, जिद्दीची गरज आहे. खासगी शाळेतील गुणवान शिक्षक आहेत. इंग्रजी शाळेला टक्कर देण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी तयारी हवी, मानसिकता तयार करण्याची, मुलांसाठी पूर्ण उर्जा खर्च करण्याची, गुणवत्तेसाठी जे जे शक्य असेल ते १०० टक्के प्रयत्न करण्याची. दिवस ढकलायच्या नकारात्मक विचाराने पीडित राहणार आहोत तर पालक मराठी शाळेत शिकायला पाठविणार आहे. शासनाच्या धोरणामुळे अतिरिक्त झालो, तरीही आपली नोकरी सुरक्षित आहे हे महत्वाचे. कुठेही जावू या लाथ मारून पाणी काढण्याची क्षमता आमच्यात आहे हे दाखवून देण्यासाठी शिक्षकांनी विचार करावा. रिक्त अतिरिक्तचा खेळ चालतच राहणार, पण माझ्या शाळेतील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही यासाठी गुणवत्तेचे पॅटर्न राबविले गेले पाहिजे.