शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटताना वडिलांचा अपघाती मृत्यू, आई जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी  : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) ...

ठळक मुद्देकेसलवाडा फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी  : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. तर पत्नी गंभीर जखमी झाली. भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.दिलीराम कवडू वाघाये (५०) रा. केसलवाडा (वाघ) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी स्नेहा वाघाये हिचा विवाह २१ एप्रिल रोजी आयोजित आहे. त्यासाठी नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी ते पत्नी संगीता (४५) यांच्यासोबत शनिवारी सकाळी केसलवाडावरून निघाले.  लाखनी येथे पेट्रोल भरून केसलवाडा (राघोर्ते), किटाळी, पालांदूर, पेंढरी या गावांना मुलीच्या लग्नपत्रिका वितरित करण्यासाठी जाण्याचे नियोजन होते. राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळण घेत असताना भंडाराकडून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक आरजे ०४ जीए ८३२२ ने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दिलीराम जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेली पत्नी संगीता गंभीर जखमी झाली. या अपघाताचे वृत्त माहित होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संगीताला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मुलीच्या लग्नाचा आनंद सोहळ्याची तयारी करताना वडिलांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात