शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:08 AM

शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता होणार : शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.शासनस्तरावरील मागण्यात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्या, कर्मचाºयांना १८ हजार रुपये किमान वेतन द्या व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचे नियम लागू करा, वर्षभरात १२ महिन्यांचे वेतन, मानधन दर महिन्याला द्या तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त कामे घेण्यात येऊ नये, स्टॅम्पपेपरवर करारनामा लिहून घेणे बंद करा, नवीन सत्रात कर्मचारी बदलने बंद करा, शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करा, कामाच्या वेळा ठरवून देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे आदी १४ मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी आले. शिष्टमंडळात भंडारा जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा आयटकचे सचिव हिवराज उके, राजू बडोले, भाग्यश्री उरकुडे, सुनिता मडावी, लता कुडेगावे, महानंदा नखाते, रिना राऊत, विद्या बोंदरे, प्रतिमा कान्हेकर, वंदना पेशने आदींचा समावेश होता.दरम्यान राज्यस्तरावरच्या मागण्यासाठी दि. २१ जूनला मुंबई मंत्रालयावर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरूष सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा