उड्डाणपुलावरुन भरधाव कंटेनर खाली कोसळला; राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथील घटना

By ज्ञानेश्वर मुंदे | Published: November 25, 2022 10:58 AM2022-11-25T10:58:43+5:302022-11-25T10:59:38+5:30

रात्रीची घटना असल्याने मोठा अनर्थ टळला

A speedy container tumbles off a flyover; Incident at Lakhni on National Highway Bhandara | उड्डाणपुलावरुन भरधाव कंटेनर खाली कोसळला; राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथील घटना

उड्डाणपुलावरुन भरधाव कंटेनर खाली कोसळला; राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथील घटना

Next

लाखनी (भंडारा)  : भरधाव कंटेनर उड्डाणपुलावरुन ३० फूट खाली कोसळल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला.

सुरतवरुन प्लास्टिक दाण्याचे पोते घेऊन कंटेनर (क्रमांक एन एल 01/AF/2950) गुरुवारी रात्री कोलकात्याकडे जात होता. लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावरून कंटेनर भरधाव जात असताना बसस्थानकाजवळ सर्विस रोडवर खाली कोसळला. यात कंटेनरचा चालक इकबाल इसाक खान (३०) बिजा ता. रामगड, जि. अलवर (राजस्थान) हा जखमी झाला.

कंटेनर खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज आल्याने लोकांची गर्दी जमली. पोलिसांनी धाव घेतली चालकाला केबिनबाहेर काढण्यात आले. त्याच्या डोक्याला गांभीर ईजा झाली होती. त्याला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: A speedy container tumbles off a flyover; Incident at Lakhni on National Highway Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.