शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात निघाला महामोर्चा,जिल्हाभरातून उसळली अफाट गर्दी

By युवराज गोमास | Updated: March 22, 2026 19:21 IST

OBC March In Bhandara: जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी एकता जिंदाबाद, उठ ओबीसी जागा हो, आंदोलनाचा धागा हो, आदी दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत दसरा मैदानावरून सकल ओबीसी महामोर्चाच्या नेतृत्वात ओबीसींचा भव्य महामोर्चा निघाला. दूरवरील गावखेड्यातील नागरिकांसमवेत विविध शहरांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

- युवराज गोमासेभंडारा - जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी एकता जिंदाबाद, उठ ओबीसी जागा हो, आंदोलनाचा धागा हो, आदी दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत दसरा मैदानावरून सकल ओबीसी महामोर्चाच्या नेतृत्वात ओबीसींचा भव्य महामोर्चा निघाला. दूरवरील गावखेड्यातील नागरिकांसमवेत विविध शहरांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महिलांसह वृद्ध, तरूण-तरूणीही रखरखत्या उन्हात हाती फलक व गळ्यात पिवळा दुपट्टा घालून एकतेचा व समतेचा आवाज उंचावतांना दिसल्या. प्रत्येकाच्या तोंडी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, युजीसी समता विधेयक लागू करा, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे, हा नारा होता.

सकाळी ११ वाजता दसरा मैदानावरून निघालेला मोर्चा गांधी चौक-पोस्ट ऑफीस चौकाने मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रीमूर्ती चौकात धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मंचावरील ओबीसी संघटनांच्या पुढाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी विरोधी धोरणांचा खरपूस घेतला. सत्ताधारी रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे असून, यांचा डीएनए कधीच ओबीसींचा नव्हता व राहणार नाही, अशी टिका केली. हे सरकार कुत्र्यांची व गाढवांची प्रगणना करते, परंतु ओबीसींची करीत नाही. ओबीसींची मुले शिक्षणापासून वंचित राहून गुलामीत व गुरढोर राखीत शेतातच मरावे, अशी विकृत मानसिकता राज्यकर्त्यांची असल्याचा प्रहार यावेळी करण्यात आला. ओबीसींनो, एक कायम लक्षात ठेवा जे ओबीसींना सहकार्य करतात, त्यांनाच निवडणुकीत सहकार्य करा, असे जाहीर आवाहन करण्यात आले.

जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनओबीसी जनगणना होत नसेल तर संपूर्ण समाजाने जनगणनेवर बहिष्कार घालावे, घरी आलेल्या प्रगणकास माहिती देवू नये, असे जाहिर आवाहन याप्रसंगी करण्यात आले. देशात ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्केपेक्षा अधिक असतांना जाणीवपूर्वक तुटपूंजा निधी मंजूर केला जातो. त्यामुळे ओबीसींची जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसींचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार एकमताने जाहीर करण्यात आला. लवकरच आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

मंचावर यांची उपस्थितीमंचावर सकल ओबीसी महामोर्चाचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, भगिरथ धोटे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, रमेश शहारे, रोशन उरकुडे, उमेश कोर्राम, गोपाल सेलोकर, जयंत झोडे, मंगला वाडिभस्मे, ललीता देशमुख, रोशन जांभुळकर, उमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, संजय आजबले, सुरेश खंगार यांची उपस्थिती होती

या लोकप्रतिनिधींचा होता शेवटपर्यंत सहभागसकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने यावेळी मंचावर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नाही. हातात ओबीसींचा झेंडा व डोक्यावर पिवळी टोपी परिधान करीत ओबीसी योद्धांसारखे विरोधी पक्षनेते आ. विजय वेडेट्टीवार, आ. नाना पटोले, आ. अभिजीत वंजारी, माजी आ. चरण वाघमारे, सभापती नरेश ईश्वरकर आदी लाेकप्रतिनिधी नागरिकांत ठाण मांडून शेवटपर्यंत बसले.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive OBC Morcha in Bhandara Demands Census, Reservation, and Ministry.

Web Summary : Bhandara witnessed a massive OBC morcha demanding an OBC census, implementation of the UGC Samata Bill, and a separate ministry. Protesters criticized government policies, calling for unity and threatening a census boycott if demands aren't met. Leaders from various parties participated.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीVidarbhaविदर्भ