शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रातून रेती वाहतूक रोखणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 31, 2023 16:44 IST

रेती चोरांची दादागिरी वाढली : महिनाभरातील दुसरी घटना

भंडारा : बेलगाव (वडगाव) येथील वनसंरक्षित कक्षातून रेतीची ट्रॅक्टरमधून सुरू असलेली चोरटी निर्यात रोखण्यासाठी रात्री हंगामी वनमजुरांसह घटनास्थळी गेलेल्या मांडवीचे वनसंरक्षक अजय उपाध्ये यांच्या चक्क अंगावरच ट्रॅक्टर घातल्याची घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले आहे. 

ही घटना बुधवारी (३० ऑगस्ट) रात्री अकरा ११.३० वाजताच्या सुमारास घडली. मांडवीचे वनसंरक्षक असलेले अजय उपाध्ये यांना गोपनीय सुत्रांकडून बेलगाव (वडेगाव) येथील कक्ष नवीन कक्ष क्रमांक १३३ या संरक्षित वनामधून काही व्यक्ती अवैधपणे रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे हंगामी वनमजूर राहुल कोडवते (सालेहेटी) आणि चिंधी मेश्राम (बेलगाव) या दोघांसह मांडवी गावातील बाजार चौकात पोहोचले. तिथून एका चारचाकी खाजगी वाहनाने ते बेलगाव येथे पोहोचून रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले. नंतर जवळपास एक किलोमीटर अंतर पायी चालत जावून बेलगाव (वडेगाव रिठी) येथील कक्ष क्रमांक १३३ मध्ये पोहचले.

या संरक्षित वनाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रामध्ये सुमारे ५० ट्रॅक्टर नदीतून अवैधपणे रेतीचा उपसा करत असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर एक व्यक्ती रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन संरक्षित वनातून येत असल्याचे दिसल्याने त्यांनी या ट्रॅक्टर चालकाला थांबण्याची सूचना केली. मात्र तो ऐकत नसल्याने उपाध्ये आडवे झाले असता ट्रॅक्टर चालकाने थेट त्यांच्या अंगावरच ट्रॅक्टर चालविला. यामुळे त्यांच्या डोक्याला तसेच, डोळे, नाक, हात, पायाला गंभीर दुखापत झाली.

रात्रीची घटना असल्यामुळे संबंधित हल्लेखोर वाहन चालक पळून गेला. यामुळे वाहन क्रमांक किंवा संबंधित ट्रॅक्टर चालकाला ओळखता आले नाही. या घटनेनंतर सोबतच्या वनमजुरांनी त्यांना भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवी १२० (बी), १४१, १४३, १४५, १४७, १४९, ३०७, ३२१, ३२३, ३३९, ३५१. ३५३, ५०९ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.एका व्यक्ती ताब्यात

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी बेरोडी येथील संदीप उमराव मेश्राम नामक एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित ट्रॅक्टरही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.महिनाभरातील दुसरी घटना

भंडारा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना आहे यापूर्वी पवनी तालुक्यातील रेती घाटावर नायब तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.संरक्षण द्या- वन कर्मचाऱ्यांची मागणी

जिल्ह्यात दिवसेंदिवस रेती चोरांचे मनोधैर्य वाढत असून त्यांच्यावर कारवाई मात्र नाममात्र होत आहे. यामुळे आम्ही जंगलाचे आणि महसुलाचे रक्षण कसे करावे, असा प्रश्न अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा