BSNLच्या भंडाऱ्यातील प्रशासकीय इमारतीला लागली आग, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 09:54 IST2023-04-23T09:53:25+5:302023-04-23T09:54:13+5:30
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

BSNLच्या भंडाऱ्यातील प्रशासकीय इमारतीला लागली आग, मोठा अनर्थ टळला
इंद्रपाल कटकवार, लोकमत, भंडारा: येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामागे असलेल्या बीएसएनएल प्रशासकीय इमारतीला रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
BSNL ची ही प्रशासकीय इमारत दुमजली आहे. कक्षातून धूर निघत असल्याचे समजताच वेळीच नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव, अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचे पथक उपस्थित होते. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.