शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अन भाऊनं मैदान मारलं! महायुतीला दोन तर साकोलीत आघाडीचा निसटता विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:05 IST

Bahndara Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate : तुमसर, भंडारात महायुती तर साकोलीत महाविकास आघाडीला यश

भंडारा : शनिवारी मतमोजणी आपला भाऊ मैदान मारेल या उत्सूकतेपोटी आलेल्या कार्यकर्त्यांनी शेवट आनंदोत्सवाने साजरा केला. भंडारात कार्यकर्त्यांनी नरेंद्र भोंडेकरांच्या तर तुमसरात राजू कारेमोरे या भाऊंच्या यशाने आनंदोत्सव मनविला, तर साकोलीत निसटत्या विजयाच्या अंतराने नाना पटोले जिंकून आले. तेथेही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

एकंदरीत कोण निवडून येणार याची चर्चा मतदान पार पडल्यानंतर सुरु झाले होते. दरम्यान राउंडनिहाय राजू कारेमोरे व नरेंद्र भोंडेकर यांनी आधीपासूनच आघाडी घेतली होती त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. साकोलीत राउंडनिहाय नाना पटोले आघाडीवर तर कधी ब्राम्हणकर समोर होते. त्यामुळे विजय कुणाचा होईल याबाबत संभ्रमता कायम होती. मात्र शेवटी पटोले यांचा विजय झाला.

मित्रपक्षांची साथ आपल्या विजयाचे सर्व श्रेय जनतेला, कार्यकार्त्यांना आणि मित्रपरिवाला आहे. त्यांचे परिश्रम मोलाचे आहेत. आपल्या विजयात लाडक्या बहिणींचाही सिहाचा वाटा आहे. या बहिणींना कुणी कमी समजू नये, असे आपण आधीपासूनच म्हणत होतो. पालकमंत्री स्थानिक असावा, ही आपली मागणी आजही कायम आहे. विकासाकामांसाठी ते आवश्यक आहे. 

विजयाची कारणे गत अडीच वर्षात भंडारा-पवनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला ही भरीव बाब भोंडेकरांसाठी सकारात्मक ठरली. लाडकी बहीण योजनेचा फायदाही भोंडेकरांसाठी लाख मोलाचा ठरला.

हा मतदारांचा आर्शिवादच तुमसर मोहाडी विधानसभेत शिक्षण आरोग्य व रोजगाराला प्राधान्य देणारा असून येथील नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या मोठा लाभ मिळाला. लाडक्या बहिणीने मला आशीर्वाद दिले त्यामुळेच मी प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आलो आहे.

विजयाची कारणे शेतकऱ्यांसह मतदारसंघात सर्वच बाबतीत कामांना विशेष प्राधान्य दिले. यात सर्वसामान्यांचा मूलभूत गरजांवर कारेमोरे यांनी फोकस केले. कार्यकत्यांची मजबूत फळी व केलेल्या कामांची जागृती करण्यात कारेमोरे यशस्वी ठरले.

कार्यकर्त्यांचा विजय मला मिळालेला विजय हा खच्या अर्थाने माझ्यासाठी साकोली मतदार संघात झुंजणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या संघर्षांनच मला आमदार म्हणून जनतेने मला पसंती दिली. मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. 

विजयाची कारणे लोकनेता म्हणून प्रसिध्द असलेले नाना पटोले यांची ख्याती निवडणूकीत महत्वाची ठरली. तालुक्यात सांगण्यासारखे मोठे कार्य नसले तरी कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ नाना पटोलेंसाठी लाख मोलांची साथ ठरली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024bhandara-acभंडाराsakoli-acसाकोलीtumsar-acतुमसरNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुती