शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअँप स्टेटसवरून भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्याने दिली जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:35 IST

Bhandara : पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : एका पक्षाला मतदान करण्यासंदर्भात त्याच पक्षातील एका दिव्यांग पदाधिकाऱ्याने आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले. यावरून साकोलीतील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी आपल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप दिव्यांग पदाधिकारी दिनेश कापगते यांनी पत्रकार परिषदेतून केला. 

बोरगाव येथील दिनेश मिताराम कापगते यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ते दिव्यांग असून, त्यांच्याकडे भाजपच्या दिव्यांग आघाडीची लोकसभेची जबाबदारी आहे. भारतीय किसान संघाचे ते जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात.

पक्षाने अन्य मतदारसंघात एका उमेदवाराला तिकीट दिल्याचे सांगत 'आपण मतदान करणार का' असे स्टेटस ठेवले. त्यावरून येथील भाजप उमेदवाराचे कार्यकर्ते असलेले एकोडी येथील देवा तरोणे यांनी दिनेशला मोबाइलवरून कॉल करून स्टेटस डिलीट करण्यास बजावले. अन्यथा जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. 

या प्रकरणी दिनेश यांनी १२ नोव्हेंबरला साकोली पोलिसांत तक्रार केली. मात्र ती दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. नंतर पोलिसांनी त्याची तक्रार हाताने लिहून घेतली. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी न्याय द्यावा आणि संरक्षण द्यावे यावे, अशी मागणी दिनेश कापगते यांनी पत्रकार परिषदेतून केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाbhandara-acभंडारा