शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८४४ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १५ हजार ५३० व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर ४९७९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत वीस दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रविवारी नव्याने ८४४ रुग्णांची भर पडली. दोन दिवसातील हा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३५२ झाली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १५ हजार ५३० व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर ४९७९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत वीस दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.त्यात भंडारा तालुक्यात ३६२, मोहाडी १४२, तुमसर ७३, पवनी ११६, लाखनी ७९, साकोली ३१ आणि लाखांदूर तालुक्यात ४१ असे ८४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९०६१ झाली असून, मोहाडी १७१४, तुमसर २६१७, पवनी २३३०, लाखनी २१९६, साकोली २०९८, लाखांदूर ८४५ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख १ हजार ६४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २० हजार ८६१ कोरोनाबाधित आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४४ तर जिल्ह्याचा मृत्युदर ०१.६८ टक्के एवढा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट भंडारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. जास्त व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी साई मंदिर परिसर, पिंडकेपार गणेशपूर, गणेशपूर बाजार, केसलवाडा व मौजा दाभा आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी घरा बाहेर फिरू नये असे आवाहन त्यांनी केले. आपल्यामुळे इतर कोणी व्यक्ती संक्रमित होणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी नूतन सावंत, मुख्याधिकारी विनोद जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या