शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

८३ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 13, 2016 00:29 IST

मानवाच्या मुलभूत गरजांपैकी प्रमुख गरज असलेली बाब म्हणजे निवारा.

सर्वाधिक लाभार्थी तुमसर तालुक्यात : २०११ च्या जनगणनेचा आधारइंद्रपाल कटकवार भंडारामानवाच्या मुलभूत गरजांपैकी प्रमुख गरज असलेली बाब म्हणजे निवारा. परंतु भंडारा जिल्ह्यातील अजुनही ८३ हजार ३५२ लाभार्थी अजुनही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत सर्वांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला असला तरी जिल्ह्यात अजुनही घरकुलांचा प्रश्न कायम आहे. केंद्र शासनाने सन २०१६-१७ पासून इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे करण्यात आले आहे. सदर योजनेकरीता लाभार्थ्यांची निवडही सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या यादीनुसार होणार आहे. या योजनेसाठी संभाव्य पात्रता लाभार्थी यादी ही केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला पंचायत समितीमार्फत प्राप्त झालेली आहे. सदर यादी ग्रामसभेपुढे वाचन करून केंद्र शासनाने दिलेल्या १३ निकषानुसार पात्र लाभार्थ्यांचे निवड करावयाची होती. परंतु कुठे ग्रामसभेने हे निकष बाजूला ठेवून त्या यादीतील फक्त ज्यांना अगोदर घरकुलाचा लाभ मिळाला आहे किंवा जे मय्यत वा गावात राहत नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी अंतिम करून पंचायत समितीकडे पाठविल्याचे बोलल्या जात आहे. या योजनेबाबत नागरिकांकडून आक्षेप व हरकतीही मागविण्यात आल्या आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत यादीतील घरकुलांना मंजुरी व निवड यादीनुसार कुंटुबाचे आधार संलग्नीकरण करायचे आहे. तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियत्यांची निवड करण्यात येणार आहे. या यादीमध्ये सदर कुटूंबाचा समावेश तर झाला नाही ना, अशीही बाब समोर येत आहे. ग्रामसभेने अंतिम केलेल्या यादीची प्रत्यक्ष तपासणी करण्याची गरज आहे. जेणेकरून सदर कुटूंबाचे नाव त्या यादीतून वगळण्यात येवू शकतील. दुसरीकडे जे खरे लाभार्थी आहेत, अशांची नावे त्या यादीत समाविष्ट नसल्याचीही ओरड होत आहे. २६ अभियंत्यांची होणार नियुक्तीभंडारा जिल्ह्यातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तालुकानिहाय सात पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक एक अभियंता सदर काम करीत होते. मात्र कामाची व्याप्ती व २५० प्रस्तावामागे एक अभियंता यानुसार जिल्हाभरात कंत्राटी पद्धतीवर २६ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ही नियुक्ती आगामी दोन महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. तुमसर तालुका आघाडीवरकेंद्र शासनाने पंचायत समितीमार्फत तालुका निहाय पाठविलेल्या याद्यांमध्ये सर्वात जास्त लाभार्थी किंवा कच्च्या स्वरूपात घर असलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तुमसर तालुका आघाडीवर आहे. तुमसर तालुक्यात १८ हजार ५२ लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच भंडारा ११,९०३, लाखांदूर ९,७२०, लाखनी ९,७११, मोहाडी ९,४९६, पवनी ९,९९९, साकोली १४,४७० अशी लाभार्थ्यांची संख्या आहे. अल्पसंख्यक लाभार्थ्यांमध्ये सात कुटूंबाची नावे आहेत. यात भंडारा तालुक्यात तीन तर लाखनी तालुक्यात चार अल्पसंख्यकांना घरकुल देण्याचे प्रस्तावित आहे. मागील इंदिरा गांधी आवास योजनेत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना एक लक्ष रूपये दिले जात होते. या योजनेचे नामकरण करून लाभार्थ्यांना दीड लक्ष रूपये बांधकामासाठी दिले जाणार आहेत.सन २०२२ पर्यंत ८५ हजार ३५१ लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यावर्षी ४,८०० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ठ आहे. दोन आॅक्टोंबरपर्यंत ग्रामसभेपुढे प्राधान्यक्रम यादी करावयाची आहे. ३१ आॅक्टोंबरपर्यंत हरकती स्वीकारण्यात येतील. नवीन योजनेनुसार प्रत्येक घरकुल बांधकामासाठी दीड लक्ष रूपये मंजुर करण्यात येणार आहे. - जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.