शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात आढळले ३,१०४ कुष्ठरोगी

By admin | Updated: February 8, 2015 23:28 IST

कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्रशांत देसाई -भंडाराकुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात १,४५२ महिला, १,६५२ पुरूषांसह २६१ बालकांचा समावेश आहे. चालू वर्षी जानेवारीपर्यंत ४५१ कुष्ठरोगी असल्याचे निष्पन्न झाले असून या पाच वर्षात २ हजार ९६८ रूग्ण औषधोपचाराने बरे झाले, हे विशेष.ज्या व्यक्तीला कुष्ठरोगाची लागण झाली अशाला समाज त्यांना वाळीत काढतात. कुष्ठरूग्णांना समाजात सन्मान मिळावा, यासाठी शासन योजनांची अंमलबजावणी करीत असला तरी, आजही त्यांचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. अशा स्थितीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासन राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबवित आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या कुष्ठरूग्णांवर औषधोपचार करून त्यांच्याबाबत असलेले न्युनगंड दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.सन २००९-१० पासून जानेवारी २०१५ पर्यंत जिल्ह्यात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरूग्ण आढळून आले आहे. यात १ हजार ४५२ महिला, १ हजार ६५२ पुरूषांचा व ० ते १४ वर्ष वयोगटातील २६१ बालकांचा समावेश आहे. या पाच वर्षात पुरूषांच्या तुलनेत महिला कुष्ठरूग्णांची संख्या दोनशेने कमी आहेत. तर एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात जिल्ह्यात ४५१ कुष्ठरोगी आढळून आले आहे.कुष्ठरोग बरा होण्यासाठी असांसर्गिक कुष्ठरूग्णांवर सहा ते नऊ महिन्यांपर्यंत औषधोपचार करण्यात येते. तर सांसर्गिक रूग्णांवर १२ महिने औषधोपचार करण्यात येतो. मागील पाच वर्षात औषधोपचाराने २ हजार ९६८ कुष्ठरोगी बरे झालेले आहेत. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात शोध मोहिमेदरम्यान ४५१ कुष्ठरूग्ण आढळून आले. यात १७८ महिला तर २७३ पुरूषांसह ४५ बालकांचा समावेश आहे. यावर्षी ३४९ कुष्ठरूग्ण बरे झाल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटण होण्यासाठी कुष्ठरोग विभाग व आरोग्य विभाग प्रयत्नरत आहेत.