भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब बाधित, आपत्ती निवारणासाठी प्रशासन दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:17 AM2020-08-31T00:17:37+5:302020-08-31T00:18:08+5:30

भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत.

2646 families affected in 58 villages of Bhandara district, administration vigilant for disaster relief | भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब बाधित, आपत्ती निवारणासाठी प्रशासन दक्ष

भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब बाधित, आपत्ती निवारणासाठी प्रशासन दक्ष

Next

भंडारा- जिल्ह्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली.

 भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत.
 बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.

Web Title: 2646 families affected in 58 villages of Bhandara district, administration vigilant for disaster relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर