शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

अविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ठळक मुद्देअभिनव योजना : आमदार विकास निधीतून राजू कारेमोरे देणार निधी

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निवडणूक म्हटली की गट-तट आलेच. एकमेकांवर कुरघोडी केली जाते. निवडणुकीच्या काळात गावात सरळ दोन गट निर्माण होतात. त्यातून वादाचे प्रसंगही येतात. अनेक गावात यातून वैमनस्य वाढीला येते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि गावागावांत एकोपा नांदण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होईल त्या गावाला आपल्या विकासनिधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हाडी (बुज.), पांजराबोरी, जांभोरा, केसलवाडा, खडकी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आरक्षण सोडत झाल्यापासून निवडणुकीचा ज्वर चढला आहे. लवकरच या गावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. गावखेड्यातील राजकारण म्हणजे टोकाचे असते. गावाच्या विकासासाठी कमी आणि प्रतिष्ठेसाठीच अधिक निवडणूका लढल्या जातात. यामुळे गावात वाद होऊन विकास खोळंबतो.हा प्रकार टाळण्यासाठी आणि गावाचा विकास व्हावा यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी - तुमसर तालुक्यात अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करणाºया गावांना आमदार विकास निधीतून सात ते २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार कारेमोरे यांनी केली आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला ११ लाख, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख, १५ आणि १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये प्राधान्याने विकास निधी दिला जाणार आहे. तसेच गावातील एखादा प्रभाग अविरोध झाल्यास त्याला तीन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.यामुळे गावात अविरोध निवडणुकीसाठी नागरिकांना प्रेरणा मिळणार आहे. गावातील गट-तट संपुष्टात येऊन गावात ऐक्याचे वातावरण निर्माण होईल.जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच उपक्रमभंडारा जिल्ह्याच्या इतिहासात असा नाविण्य उपक्रम आमदार राजू कारेमोरे राबवित आहेत. गावाच्या विकासाला चालना देणारा हा उपक्रम असून यामुळे गावात एकतेची शक्ती वाढणार आहे. सामंजस्यातून ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून येतील. त्यामुळे कोणतेही गट-तट गावात राहणार नाहीत. गावाची ओळख आदर्श गाव म्हणून होण्यास वेळ लागणार नाही.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून आदर्श गाव निर्मितीची चळवळ सुरु व्हावी, असा माझा प्रयत्न आहे. विकासनिधी मतदार संघातील गावांना दिला जातो. परंतु अविरोध निवडणूक होणाºया गावांना प्राधान्याने विकास निधी दिला जाईल. एकता व आदर्श निर्माण व्हावी हे माझे स्वप्न असून ते साकार करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व तालुक्यातील जनता याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.-राजू कारेमोरे, आमदार तुमसर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक