शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० टक्के क्षेत्र रोवणीविना

By admin | Updated: September 5, 2016 00:36 IST

पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रातील पेरणी अद्यापही खोळंबली आहे.

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे संकटदेवानंद नंदेश्वर भंडारापावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील ३२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रातील पेरणी अद्यापही खोळंबली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १ लाख ७७ हजार ९२ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड निर्धारीत करण्यात आले होते. आतापर्यंत ८४ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आजही २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रातील रोवणी खोळंबली आहे. १ लाख ५३ हजार ८९० हेक्टरमधील रोवणी आटोपली असली तरी पाण्याअभावी रोवणी करपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाची गडद छाया आहे. पावसाने दडी मारल्याने येथील शेतपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धात मुसळधार पडणाऱ्या पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. पावसाची अनियमितता व शेतपिके उभे असताना शेतपिकांना बसलेला वादळी फटका यामुळेही शेती व्यवसायावर चांगलाच आघात झाला. शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव असल्याने अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस बेपत्ता असल्याने शेतकरी संकटाच्या खाईत लोटला आहे. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज क्षणाक्षणाला वाईट होत चालली आहे. सिंचनाचा अभावामुळे अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु निसर्गही आता लहरीपणाने वागायला लागला आहे.यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत आहे. या प्रकारामुळे पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे. शासनाने मदतीचा हात म्हणून किटकनाशके औषधी विनामूल्य देऊन शेतकरी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संपूर्ण शेतकरीवर्ग संतापलेला आहे. सध्या उन्हाळ्यासारखे ऊन तापायला लागले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी आहेत, अशा शेतकऱ््यांवर विजेचे संकट उभे ठाकले आहे. २४ तासातून बारा ते सोळा तास भारनियमनामुळे ग्रामीण भागातील वीज गायब राहते. शेतीला पाणी केव्हा द्यायचे आणि जेवायचे, झोपायचे केव्हा, हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. एकूणच तिहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. या महिन्यात भारनियमन केले नाही तर किमान जलसिंचन चांगले होईल व पिकाला पाणी मिळेल, अशी आशा बाळगणारा बळीराजा आशेवरच आहे.