कत्तलीस जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:36 AM2019-09-01T00:36:35+5:302019-09-01T00:37:08+5:30

कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

19 animals rescued by slaughterhouses | कत्तलीस जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका

कत्तलीस जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देआंधळगाव येथे कारवाई । दोन जणांना अटक, तीन लाख ७१ हजारांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अत्यंत निर्दयपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आंधळगाव अंतर्गत रामपूर मार्गावर सापळा रचण्यात आला. त्यावेळी रामपूरकडून एक पिकअप वाहन भरधाव जाताना दिसले. सदर वाहनाला थांबविले असता त्यात अत्यंत निर्दयपणे जनावरे कोंबून असल्याचे दिसले. पोलिसांनी या वाहनातून १९ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी वाहनचालक मोहम्मद वकील (३२) रा.मदनचौक कामठी आणि राजेश बाबूराव ठाकरे (३६) रा.रामपूर यांना अटक केली.
सदर जनावरांची रवानगी खैरी पिंपळगाव येथील सुकृत गोशाळेत करण्यात आली आहे. वाहनचालकांविरुद्ध निर्दयपणे जनावरांची वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम, सहाय्यक फौजदार वालदे यांनी केली आहे.

Web Title: 19 animals rescued by slaughterhouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.