शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात १४ हजार शेतकऱ्यांचे १४७ कोटींचे चुकारे अडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:01 IST

Bhandara : रब्बीत ६ लाख ४२ हजार ८१० क्विंटल धानाची झाली खरेदी

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर पैशाची नितांत गरज असताना रब्बीतील धान खरेदीचे चुकारे अडकल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात १४ हजार १३९ शेतकऱ्यांकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत २१४ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर ६ लाख ४२ हजार ८१० क्विंटल धानाची खरेदी झाली; परंतु १० जूनपर्यंत एकही शेतकऱ्यांना चुकारे प्राप्त झालेले नाहीत. बोनसच्या घोषणेप्रमाणे शासनाने मांडलेली ही थट्टाच असल्याचा संताप शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे २३३ शासकीय धान खरेदी केंद्रांनी शेतकरी नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी २१४ केंद्रांनी प्रत्यक्षात ऑनलाइन पोर्टलनुसार धान खरेदी सुरू केली. आतापर्यंत एकूण ३९ हजार १९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. एकूण १४ हजार १३९ शेतकऱ्यांनी विविध केंद्रांच्या माध्यमातून ६ लाख ४२ हजार ८१० क्विंटल धानाची विक्री केली. शासकीय हमी भाव २३०० रुपयांप्रमाणे १४७ कोटी ८४ लाख ६३ हजार ४१४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते; परंतु खरीप हंगामाला प्रारंभ झाला असताना अद्यापही धानाचे चुकारे शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही. 

बोनस व चुकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या नजराराज्य शासनाने विधानसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनसची घोषणा केली होती; परंतु अद्यापही बोनसचा एक रुपया शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. आता धानाचे हक्काचे पैसेसुद्धा प्राप्त झालेले नसल्याने शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. चुकाऱ्यांसाठी शासन केव्हा निधी उपलब्ध करून देतो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गत वर्षाच्या तुलनेत धान खरेदी दुप्पटसन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात १३ हजार १२६ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली होती. एकूण ७२९४ शेतकऱ्यांकडून ३ लाख ११ हजार ९७६.४५ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. सन २०२४-२५ मध्ये ३९ हजार १९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १४ हजार १३९ शेतकऱ्यांनी ६ लाख ४२ हजार ८१० क्विंटल धानाची विक्री केली.

खरिपातील १० कोटींच्या वितरणाला प्रारंभजिल्ह्यात खरीप हंगामात ३१ मार्चपर्यंत झालेल्या धान खरेदीसंबंधीची जवळपास १० कोर्टीची रक्कम जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झालेली आहे.

१५ जूनपर्यंत करता येणार नोंदणीशासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरीfarmingशेती