दाेन दिवसात 1300 पाॅझिटिव्ह तर 48 रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:50+5:30
शनिवारी भंडारा जिल्ह्यात ३२०८ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तसेच रविववारी २ हजार ५५१ नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६१५ व्यक्ती काेराेनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ८२५ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १० हजार ३६८ इतकी आहे.

दाेन दिवसात 1300 पाॅझिटिव्ह तर 48 रुग्णांचा मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दाेन दिवसात १३०० रुग्ण काेराेनाबाधित आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ६८५ तर रविवारी ६१५ व्यक्ती बाधित आढळले. तसेच शनिवारी ३५ तर रविवारी १३ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे काेराेना बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. बरे हाेण्याचे प्रमाण ७८.३७ टक्के आहे.
शनिवारी भंडारा जिल्ह्यात ३२०८ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाचे नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. तसेच रविववारी २ हजार ५५१ नमुणे तपासण्यात आले. त्यापैकी ६१५ व्यक्ती काेराेनाबाधित आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ८२५ व्यक्तींच्या घश्यातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १० हजार ३६८ इतकी आहे.
शनिवारी तब्बल ११९३ रुग्ण बरे हाेवून घरी परतले. तसेच रविवारी ९३३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शनिवारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ३४४, माेहाडी ३१, तुमसर ३४, पवनी ९४, लाखनी ७२, साकाेली ७६, लाखांदूर तालुक्यातील ३४ व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारी काेराेनामुळे ३५ रुग्णांचा मृत्यू झाला.
रविवारी ६१५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. यात भंडारा तालुक्यातील २११, माेहाडी ४५, तुमसर ९२, पवनी १९, लाखनी ५८, साकाेली १९० व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली आहे. रविवारी काेराेनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी जिल्ह्यात काेराेनामुळे आतापर्यंत ८८० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ७८.३७ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.६९ टक्के एवढा आहे.
काेराेनाने सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात
- काेराेनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८८० जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात आहे. आकडेवारीवर नजर घातल्यास ८८० मृत्यू संख्येपैकी मृत पावलेले ४२८ व्यक्ती हे एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुमसर तालुक्यातील ९४, पवनी तालुक्यातील ९०, माेहाडी ७९, साकाेली ७६, लाखनी ७२, तर लाखांदूर तालुक्यातील ४१ व्यक्तींना काेराेनामुळे जीव गमवावा लागला आहे.
४०,७५६ रुग्णांची काेराेनावर मात
- जिल्ह्यात काेराेनाबाधितांची एकुण संख्या ५२ हजार ४ इतकी असून आतापर्यंत यापैकी ४० हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली आहे. नागरिकांनी न घाबरता लसीकरण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.