लोकमत न्यूज नेटवर्कपवनी (भंडारा) : शाळेत खोडसाळपणा केला; त्यामुळे शिक्षक रागावले. आता शिक्षा होणार, घरी कळल्यावर घरूनही मार मिळणार ! अखेर त्याने एआयला सल्ला विचारला. मात्र त्याने खरे ते सांगण्याचा सल्ला दिला. आता करायचे काय? अखेर शिक्षा चुकविण्यासाठी विद्यार्थ्याने चक्क स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. सारेच चक्रावले. पोलिसांच्या तांत्रिक तपासात मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. मात्र यामुळे पोलिस, पालक आणि शाळा नाहक वेठीस धरली गेली.
पवनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी घडला. १२ वर्षाच्या या विद्यार्थ्यांचे शाळेतील एका मुलासोबत भांडण झाले. मारामारीही झाली. त्यानंतर मुलाने फळ्यावर अभद्र मजकूर लिहिला. या प्रकरणी पालकांना शाळेत बोलाविण्यास सांगण्यात आले. आता घरी आणि शाळेतही रागावले जाईल किंवा मोठी शिक्षा होईल, अशी भीती मुलाच्या मनात होती. बचावासाठी त्याने चक्क स्वतःच्या अपहरणाचा प्लॅन तयार केला. मुलाने आपल्या पालकांशी संपर्क साधून, काही अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत माझे अपहरण केल्याची माहिती मोबाइलवरून दिली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बरीच विसंगती आढळली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुलाचे लोकेशन शोधून काढले आणि अवघ्या तीन तासांत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत दिली कबुली
मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने शिक्षेच्या भीतीने हे सर्व नाट्य रचल्याची कबुली दिली. पालकांना आणि शिक्षकांना घाबरवण्यासाठी मी हा बनाव रचला होता, असे त्याने सांगितले. मुलाचे उत्तर ऐकून पोलिस आणि पालकही अवाक् झाले. या घटनेमुळे मुलांवरील अभ्यासाचा किंवा शिस्तीचा अतिरेक ताण असे टोकाचे पाऊल उचलण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Web Summary : A 12-year-old in Bhandara faked his own kidnapping to avoid punishment for misbehavior at school. He contacted his parents claiming abduction, but police investigations revealed the truth within three hours. Fear of reprimand drove the boy to this extreme act.
Web Summary : भंडारा में एक 12 वर्षीय लड़के ने स्कूल में दुर्व्यवहार के लिए सजा से बचने के लिए अपने अपहरण का नाटक किया। उसने चाकू दिखाकर अपहरण करने का दावा किया, लेकिन पुलिस जांच में तीन घंटे के भीतर सच्चाई सामने आ गई। फटकार के डर से लड़के ने यह कदम उठाया।