शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘भिमलकसा’ला मिळणार ११६.०३ हेक्टर वनजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:14 IST

वडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाकरीता अखेर ११६.०३ हेक्टर वनजमिन वळतेकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे.

चार दशकांची प्रतीक्षा : ९३१ हेक्टर क्षेत्राला होणार सिंचन देवानंद नंदेश्वर/संजय साठवणे भंडारा/ साकोलीवडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाकरीता अखेर ११६.०३ हेक्टर वनजमिन वळतेकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे गत अनेक दशकापासून बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतीला सिंचनाची सोय होवनू हरीतक्रांती घडेल. हा प्रकल्प ४४ वर्षांपासून वनकायदा व शासनाची परवानगी यात रखडलेला होता. भिमलकसा लघु प्रकल्पाला ८ मे १९७३ अन्वये २४.९० लाख रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर याप्रकल्पाचे काम जानेवारी १९७५ मध्ये रोजगार हमी योजनेतून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ९३१ हेक्टर असून त्यावेळी या धरणाचे मातीकाम घळभरणी वगळता पुर्ण करण्यात आले होते. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पुर्ण झाल्यानंतर १८ मे १९८६ ला वनकायदा अस्तित्वात आला व या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २००८-०९ ला या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका झाली. त्यानंतर काम थंडबस्त्यात राहिले. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बरेचदा लोकप्रतिनिधीची भेट घेतली. एकदा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र त्याचा फायदा झाला नाही. वनकायद्यातून सुटका झाली तेव्हा वनजमिनीचे मालमत्ता मुख्य ११२९.५८८ लाख वनविभागास भरावयाची होती. कामाची किंमत १५१७.५५७ लाख असे एकूण २६४७.१४५ लाख रुपए शासनास मंजुर करावयाचे होते. तेव्हापासून ही फाईल कासवगतीने वनमंत्रालयात जमा होती. आमदार बाळा काशीवार यांनी या प्रकल्पाला मार्गी लावण्याचा निर्धार केला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घातले होते. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली. १८ फेब्रुवारीला भिमलकसा प्रकल्पासाठी ११६.०३ हेक्टर वनजमिन वळते करण्याचा निर्णय शासनाने घेतला. वळतीकरण भारत सरकारच्या २६ नोव्हेंबर २००८, १७ जुलै २०१५ व ७ जानेवारी २०१७ रोजीच्या पत्रांतील अटी व शर्तीच्या पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंचनाचा लाभसदर प्रकल्प पूर्ण झाल्यास जमनापूर २३२ हेक्टर, पाथरी ९५ हेक्टर, वडेगाव १४४ हेक्टर, खांबा ३०१ हेक्टर, तुडमापुरी १५९ हेक्टर असे एकूण ९३१ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.