भरधाव ट्रकने ११ वर्षीय बालकास चिरडले; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:09 IST2019-12-12T10:15:36+5:302019-12-12T15:09:43+5:30
भरधाव जाणाऱ्या ट्रकने एका ११ वर्षीय बालकास चिरडल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास भंडारा जिल्ह्यात घडली.

भरधाव ट्रकने ११ वर्षीय बालकास चिरडले; भंडारा जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्देनागरिक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: भरधाव जाणाऱ्या ट्रकने एका ११ वर्षीय बालकास चिरडल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास भंडारा जिल्ह्यात घडली. भंडारा-वरठी मार्गावर असलेल्या सिरसी या गावात राहणाºया प्रथमेश गायधने या ११ वर्षांच्या मुलाचा यात करुण मृत्यू झाला. या घटनेने गावकरी संतप्त झाले असून त्यांनी या मार्गावरच रास्ता रोको आंदोलन सुरू केले असून चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.